Maharashtra: राज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; पुण्यात हवामान कोरडे, उकाड्यात हळूहळू होतेय वाढ

By श्रीकिशन काळे | Published: February 22, 2024 03:43 PM2024-02-22T15:43:09+5:302024-02-22T15:43:58+5:30

दरम्यान, पुण्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार असून, सध्या पुणेकरांना उकाडा जाणवू लागला आहे....

Maharashtra: Rain forecast for 3 days in state; Weather in Pune is dry, heat is slowly increasing | Maharashtra: राज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; पुण्यात हवामान कोरडे, उकाड्यात हळूहळू होतेय वाढ

Maharashtra: राज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; पुण्यात हवामान कोरडे, उकाड्यात हळूहळू होतेय वाढ

पुणे : विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी मात्र कोरडे हवामान राहणार आहे. कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला. दरम्यान, पुण्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार असून, सध्या पुणेकरांना उकाडा जाणवू लागला आहे.

महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अश्या ९ जिल्ह्यात उत्तरेकडून घुसणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटेच्या किमान तापमान १४ तर कमाल ३० ते ३२ डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. ही तापमाने जवळपास सरासरी इतके किंवा त्याखाली जाणवत आहे. महाराष्ट्रातील उर्वरित २७ जिल्ह्यात ही तापमाने काहीशी अधिक असून, ती १७ व ३४ डिग्री से. ग्रे. दरम्यान जाणवत आहे.

फेब्रुवारीअखेर सध्याच्या हिवाळी हंगाम संपून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरु होण्याचा संक्रमणाचा हा काळ असतो. साधारणपणे पूर्वमोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली दिसू लागतात. ह्या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटीसह विजा अन‌् गारांचा पाऊस कोसळत असतो.


सध्या हवेच्या कमी दाबाचा आस सहित वारा खंडिता प्रणालीनूसार कार्यरत आहे. बंगाल उपसागरातील उच्च हवेच्या दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यातून आसाच्या पूर्वेला दक्षिणेकडून तर पश्चिमेला उत्तेकडून एक किमी. उंचीपर्यंत वारे वाहत आहेत. त्यामुळे फक्त विदर्भ मराठवाड्यातील १५ जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

- माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

Web Title: Maharashtra: Rain forecast for 3 days in state; Weather in Pune is dry, heat is slowly increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.