Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; पुढील तीन तासांमध्ये 'या' भागात पडणार पाऊस

By श्रीकिशन काळे | Published: June 29, 2024 04:51 PM2024-06-29T16:51:14+5:302024-06-29T16:53:33+5:30

सध्या देशभरात मॉन्सून पोचलेला आहे. हरयाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा काही भाग अद्याप मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत....

Maharashtra: Rain warning in Konkan, Madhya Maharashtra; Rain will fall in 'this' area in next three hours | Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; पुढील तीन तासांमध्ये 'या' भागात पडणार पाऊस

Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; पुढील तीन तासांमध्ये 'या' भागात पडणार पाऊस

पुणे : राज्यात मॉन्सून सक्रिय झाला असून, देशातील बहुतांश भाग त्याने व्यापला आहे. येत्या तीन-चार तासांमध्ये राज्यातील पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचे हजेरी लागणार आहे. तर घाट माथ्यावर जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान, पुण्यात सायंकाळनंतर हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

सध्या देशभरात मॉन्सून पोचलेला आहे. हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा काही भाग अद्याप मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. या भागात दोन दिवसांमध्ये मॉन्सून पोचेल आणि मग संपूर्ण देश मॉन्सूनने व्यापेल. दरम्यान, सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिला आहे. पुढील ४ दिवस राज्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो आणि विदर्भात काही भागात पुढील ४ दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

आज शनिवारी (दि.२९) माॅन्सूनची सीमा जैसलमेर, भिवानी, दिल्ली, अलिगड, हरदोल, मुरादाबाद, पठाणकोट आणि जम्मू भागामध्ये आहे. पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, माॅन्सून दोन दिवसांत संपूर्ण देश व्यापणार आहे. सध्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची नोंद होत आहे. आज सकाळी ८.३० वाजता लोणावळा ३७ मिमी, शिरगाव ४५ मिमी, अंबोणे १४४ मिमी, कोयना ३६ मिमी, खोपोली २६ मिमी, ताम्हिणी ५८ मिमी आणि भीरा येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली.

Web Title: Maharashtra: Rain warning in Konkan, Madhya Maharashtra; Rain will fall in 'this' area in next three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.