Maharashtra | मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या संगीता डवरेंचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:37 IST2023-04-04T13:35:51+5:302023-04-04T13:37:50+5:30
काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता...

Maharashtra | मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या संगीता डवरेंचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू
पुणे : मुंबईत मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संगीता डवरे यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. डवरे यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
संगीता डवरे यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचा अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर नीट उपचार केले नव्हते. या डॉक्टर यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन डवरे या मंत्रालयात पोहचल्या होत्या. या गोष्टी संदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने त्यांनी मंत्रालयातच २७ मार्च रोजी विषप्राशन केले होते. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.