कुस्तीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:07 IST2025-02-09T13:07:08+5:302025-02-09T13:07:59+5:30
विविध स्पर्धांमधील मेडलच्या टॅलीमध्ये कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र हा सर्वात पुढे दिसावा

कुस्तीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा
- हिरा सरवदे
पुणे :महाराष्ट्रात खूप चांगले पैलवान आहेत. पण अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मेडल टॅलीमध्ये महाराष्ट्र हवा त्या प्रमाणात दिसत नाही. कुस्तीच्या क्षेत्रातील रतीव महारतींनी याबाबतचा कार्यक्रम आखावा, आणि पुढील काळामध्ये एसिया, ऑलंपीक, कॅमनवेल्थ आणि वर्डकप अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमधील मेडलच्या टॅलीमध्ये कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र हा सर्वात पुढे दिसावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बालन ग्रुपचे पुनीत बालन आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मातीतील कुस्ती ही महाराष्ट्रात खूप प्राचिन काळापासून लोकप्रिय आहे. कुस्ती आपला पारंपारिक खेळ असून आखाड्यांची मोठी परंपरा आहे. या परंपरेतून अनेक पैलवान तयार होतात. पुणे हा पैलवानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आशा कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्वाचे आहे.
आपल्या पैलवानासांठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या. विविध पुरस्कार मिळवणाऱ्या मल्लांच्या मानधनात वाढ केली आहे. यामागे अधिकाधीक मल्ल तयार झाले पाहिजेत, अशी भावना आहे. मात्र, एका गोष्टीची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात खूप चांगले पैलवान आहेत. पण अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मेडल टॅलीमध्ये महाराष्ट्र हवा त्या प्रमाणात दिसत नाहीय.
या दृष्टीने आपणास अधिक काय करता येईल, वेगळ्या प्रकारचे काय प्रशिक्षण असावे, याचा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी सरकार सुद्धा पुढाकार घ्यायला तयार आहे. मात्र, कुस्तीच्या क्षेत्रातील रतीव महारतींनी याबाबतचा कार्यक्रम आखावा, आणि पुढील काळामध्ये एसिया , ऑलंपीक, कॅमनवेल्थ, वर्डकप अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमधील मेडलच्या टॅलीमध्ये महाराष्ट्र हा सर्वात पुढे दिसावा, अशी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.