Maharashtra SSC Results 2018 : दहावीचा निकाल ८९.४१ टक्के; 'या' लिंकवर पाहा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:18 AM2018-06-08T11:18:03+5:302018-06-08T11:59:05+5:30
राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 89.41 टक्के लागला आहे
पुणे - राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 89.41 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मुलींनी यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९१.९७ टक्के तर मुलांची ८७.२७ टक्के आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी दहावीची लगेच १७ जुलै २०१८ पासून फेर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला अनुत्तीर्ण विद्यार्थां बरोबरच श्रेणी सुधार करू इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येणार आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला होता, त्यातुलनेत यंदाच्या निकालात ०.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यातून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
विभागनिहाय दहावीच्या निकालाची टक्केवारी
- मुंबईः टक्के ९०.४१ %
- कोकणः टक्के ९६.०० %
- पुणेः टक्के ९२.०८ %
- नाशिकः टक्के ८७.८२ %
- नागपूरः टक्के ८५.९७ %
- कोल्हापूरः टक्के ९३.८८ %
- अमरावतीः टक्के ८६.४९ %
- औरंगाबादः टक्के ८८.८१ %
- लातूरः टक्के ८६.३० %
या वेबसाइटवर पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
असा पाहा निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर P123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात P123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.