Maharashtra: राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर, मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाखांवर

By नितीन चौधरी | Published: January 23, 2024 03:45 PM2024-01-23T15:45:34+5:302024-01-23T15:46:06+5:30

यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती...

Maharashtra State's final voter list released, number of voters at 9 crore 12 lakh | Maharashtra: राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर, मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाखांवर

Maharashtra: राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर, मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाखांवर

पुणे : राज्याची अंतिम मतदारयादी अखेर जाहीर करण्यात आली असून राज्यात ९ कोटी १२ लाख ४३ हजार १० मतदार येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानास पात्र ठरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीच्या तुलनेत अंतिम मतदार यादीत १८ ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या १४ लाख ३ हजार ७९८ ने वाढून ही संख्या आता १ कोटी ७३ लाख ६३ हजार ८६५ इतकी झाली आहे.

यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून २३ जानेवारी २०२४ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला गेला. या काळात राज्यात २४ लाख ३३ हजार ७६६ मतदारांनी नव्याने नावनोंदणी केली. तर २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. नव्याने वाढलेल्या मतदारांमध्ये १ लाख १ हजार ८६९ पुरुष, ३ लाख ८ हजार ३०६ स्त्री मतदार तसेच ५७२ तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९१७ वरून ९२२ इतके झाले आहे.

राज्यात एकूण मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाख ४३ हजार १० इतकी झाली आहे. त्यात ४ कोटी ७४ लाख ७२ हजार ३७९ पुरुष, ४ कोटी ३७ लाख ६६ हजार ८०८ तर ५ हजार ४९२ तृतीयपंथी मतदार आहेत. या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये ६ लाख ७० हजार ३०२ मतदारांची नव्याने भर पडली आहे. तर २० ते २९ या वयोगटात ८ लाख ३३ हजार ४९६ मतदारांची वाढ झाली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या ३ लाख ४८ हजार ६९१ (०.३८ टक्के) होती, ती अंतिम मतदार यादीत ही संख्या १० लाख १८ हजार ९९३ (१.१२ टक्के) इतकी झाली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या १ कोटी ५५ लाख ११ हजार ३७६ (१७.८ टक्के) होती. ती अंतिम यादीत १ कोटी ६३ लाख ४४ हजार ८७२ (१७.९१ टक्के) इतकी झाली आहे.

सर्वाधिक मतदार असलेला जिल्हा : पुणे ८१ लाख २७ हजार १९

सर्वात कमी मतदार असलेला जिल्हा : सिंधुदुर्ग ६ लाख ५७ हजार ७८०

विशेष शिबिरांमधून भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण १६ हजार ४४३ जणांची मतदार नोंदणी करण्यात आली. तर कातकरी (काथोडी), माडिया गोंड, कोलाम या समूहातील ३८ हजार ८७६ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांतील १५० मतदान केंद्रे ही मोठ्या गृहनिर्माण संकुलामध्ये ठेवण्यात आलेली आहेत.

- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

Web Title: Maharashtra State's final voter list released, number of voters at 9 crore 12 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.