Maharashtra | राज्यात साेमवारपासून वाजणार शाळेची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 03:05 PM2022-06-10T15:05:01+5:302022-06-10T15:10:01+5:30
शाळेची घंटा वाजणार....
पुणे : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष साेमवार(१३ जून)पासून सुरू होणार आहे. त्यामुळे शाळेची घंटा वाजणार आहे. तरीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बुधवार(१५ जून)पासून शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
राज्यातील सर्व शाळा येत्या १३ जूनपासून सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, विदर्भातील तापमानाचा विचार करता, तेथील सर्व शाळा २८ जूनपासून सुरू होणार आहेत.
येत्या १३ व १४ जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण करणे, काेराेनाचा धाेका विचारात घेऊन आरोग्यविषयक प्रबोधन करणे अपेक्षित आहे. विदर्भातील शाळांमधील शिक्षकांनी २४ व २५ जून रोजी शाळा करून शाळेची स्वच्छता करावी, असेही सूरज मांढरे स्पष्ट केले आहे.