Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड

By नितीन चौधरी | Published: April 13, 2024 06:01 PM2024-04-13T18:01:50+5:302024-04-13T18:02:21+5:30

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.....

Maharashtra: Unseasonal ravages for 6 consecutive days, seven and a half thousand hectares of crops desolated | Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड

Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड

पुणे : राज्यात सुलभ सहाव्या दिवशी अर्थात शनिवारीही अवकाळीने विदर्भाला झोडपून काढले असून मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारीदेखील विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

राज्यात मंगळवारपासून (दि. ९) सलग सहा दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांना चांगले झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांच्या पिकांचे व काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात बारमाही पिकांमध्ये लिंबू, संत्रा, आंबा, चिकू, पपई, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कलिंगड, खरबूज, उन्हाळी मूग, भुईमूग, रब्बी ज्वारी, गहू या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळगावात सर्वाधिक नुकसान -

कृषी विभागाने मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल राज्य सरकारला पाठवला असून त्यानुसार राज्यात ७ हजार ४८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ३ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यातही १ हजार २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून नांदेड जिल्ह्यात ७४८ हेक्टर तर वर्धा जिल्ह्यात ५२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारी व शनिवारीदेखील राज्यात राज्यातील विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या अहवालानंतर नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

आजही विदर्भात अवकाळीची शक्यता -

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मात्र, हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. सलग सहा दिवस अवकाळीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने झाले असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या निवडणूक आचारसंहितेची अडसर असून तो दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली जाणार असल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.

अवकाळी पाऊसजिल्हा नुकसान हेक्टरमध्ये

संभाजीनगर १६३
जालना १३३.३

परभणी २.६६
हिंगोली २९७

नांदेड ७४८.५
बीड १०२०.९

लातूर १६०.२
धाराशिव ३०८

जळगाव ३९८४
सोलापूर ५३

वर्धा ५२७.७
नागपूर ८०.४

गडचिरोली १०.६
एकूण ७४८९

Web Title: Maharashtra: Unseasonal ravages for 6 consecutive days, seven and a half thousand hectares of crops desolated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.