पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असेल; अनिल परब यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 08:17 PM2022-04-03T20:17:09+5:302022-04-03T20:17:16+5:30

परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते पर्यायी इंधन परिषदेच्या रॅलीचा नवीन कृषी मैदान येथे शुभारंभ करण्यात आला.

Maharashtra will be a leader in green mobility in alternative fuel vehicle green mobility Information of Anil Parab | पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असेल; अनिल परब यांची माहिती

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असेल; अनिल परब यांची माहिती

Next

पुणे : पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले आहे. याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या रॅलीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केला. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते पर्यायी इंधन परिषदेच्या रॅलीचा नवीन कृषी मैदान येथे शुभारंभ करण्यात आला. 

परब म्हणाले, पर्यावरण बदलांमध्ये गाड्यांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हे एक मोठे करण आहे. यामध्ये बदल करायचे असेल तर आपल्याला पर्यायी इंधनाकडे वळावे लागेल. या रॅलीमध्ये जवळपास ३५० इलेक्ट्रिकल वाहन सहभागी झाले आहेत. यावरुन आपली वाटचाल योग्यदिशेने सुरू असल्याचे लक्षात येते. या धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अशाप्रत्येक उपक्रमाला राज्यशासन प्रोत्साहन देईल. पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल वाहनाच्या बॅटरीमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकल वाहन वापरण्याचे सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भारत ससाणे, एमआयडीसीचे महाव्यवस्थापक अभिजित घोरपडे, प्रादेशिक अधिकारी संजीव अधिकारी संजीव देशमुख, अविनाश हदगल, एमसीसीआयएचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.

Web Title: Maharashtra will be a leader in green mobility in alternative fuel vehicle green mobility Information of Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.