'महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही', जनसन्मान यात्रेनंतर युगेंद्र पवारांची बारामतीत ‘स्वाभिमान यात्रा’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 05:30 PM2024-09-09T17:30:01+5:302024-09-09T17:31:01+5:30

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा पुरोगामी विचार बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश असेल

Maharashtra will never bow to Delhi After Jan Sanman Yatra Yugendra Pawar Swabhiman Yatra in Baramati | 'महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही', जनसन्मान यात्रेनंतर युगेंद्र पवारांची बारामतीत ‘स्वाभिमान यात्रा’

'महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही', जनसन्मान यात्रेनंतर युगेंद्र पवारांची बारामतीत ‘स्वाभिमान यात्रा’

बारामती : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच बारामतीत विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापु लागले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील जनसन्मान यात्रेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ‘स्वाभिमान यात्रा’ काढण्यात येणार आहे. मंगळवार(दि १०)पासून या यात्रेची सुरवात होत आहे.

सकाळी ९ वाजता युगेंद्र पवार हे कन्हेरीच्या मारुतीरायाचे दर्शन घेवून यात्रेची सुरवात होणार आहे. त्यानंतर ९.१५ वाजता माळावरची देवीचे दर्शन घेवुन युगेंद्र पवार पक्ष कार्यालयात १२ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता ते मुढाळे येथील बैलगाडा शर्यतीस भेट देणार आहेत. दुपारी ३ वाजता माळेगांव बुद्रुक, ४ वाजता गोफणे व वाघमोडे वस्ती, ५ वाजता माळेगांव कारखाना, ६ वाजता पवार येळे ढाळे वस्ती येथे भेट देणार आहेत. स्वाभिमानी यात्रा १२ दिवस सुरु राहणार आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व गावांना भेटी देण्यात येणार आहेत. या यात्रेची पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही

‘पवारसाहेब’ यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि ‘पवारसाहेबां’चा पुरोगामी प्रागतिक विचार बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. यामध्ये जनतेशी मुक्त संवाद करणार आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही, ना यापुढे झुकेल’ या स्वाभिमानी विचाराचा जागर करण्यासाठी, या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्यांचे मनोबल आणखी वाढविण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी बारामतीकरांना भेटणार आहे. तसेच यावेळी लोकसभेत दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. बारामतीकरांनी या यात्रेमध्ये अवश्य सहभागी व्हावे. यात्रेच्या निमित्ताने स्वाभिमानी विचारांचा चौफेर जागर करुया,असे आवाहन पवार यांनी केले आहे.

Web Title: Maharashtra will never bow to Delhi After Jan Sanman Yatra Yugendra Pawar Swabhiman Yatra in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.