एखाद-दुसरा उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे फार नुकसान नाही - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:23 AM2023-01-09T09:23:56+5:302023-01-09T09:24:20+5:30

राज्यकर्ता मोठ्या मनाचा हवा, तो कधीच व्यापारी नसावा

Maharashtra will not lose much if one or the other industry goes out Raj Thackeray | एखाद-दुसरा उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे फार नुकसान नाही - राज ठाकरे

एखाद-दुसरा उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे फार नुकसान नाही - राज ठाकरे

Next

पिंपरी : महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे एखाद-दुसरा उद्योग बाहेर गेल्याने  महाराष्ट्राचे फार नुकसान होणार नाही. हा ‘दर्या मे खसखस’ असा हा प्रकार आहे. आपण गुजरातचे आहोत म्हणून त्याच भागाला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही. राज्यकर्ता मोठ्या मनाचा असावा. तो कधीच व्यापारी नसावा. व्यापारी त्याच्या हाताखाली असावा, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहरात जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या वतीने शोध मराठी मनाचा या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात ठाकरे बोलत होते. त्यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ व्यंगत्रिकार प्रभाकर वाईरकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी घेतली. त्यात ठाकरे यांनी व्यंगचित्रकला, तिचे भवितव्य, मुस्कटदाबी, सध्याचे राजकारण, बेरोजगारी यावर परखड मते मांडली. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि यशराज पाटील यांनी ठाकरे यांचा सत्कार केला.

राजकीय स्थिती लयाला गेली

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ठाकरे म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये म्हटले होते की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर त्यांनी पहिले पाच वर्षे उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावे. एखाद्या भूमिकेला विरोध करणे राजकारणात काही गैर नाही. पण, त्या माणसाने चांगली गोष्ट केली तर त्याचे अभिनंदन करण्यात मोठेपणा आणि मोकळेपणाही असावा लागतो. आजची राजकीय स्थिती एवढी लयाला गेली आहे. सधा सुरू असलेले राजकारण नव्हे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांबद्दल बोलणे, कोणी कशावरही बोलायला लागले. कोणीही इतिहासतज्ज्ञ होत आहेत.’

बडबड करण्याचे राजकारण

राज ठाकरे म्हणाले, ‘‘सध्या राज्यात सुडाच्या राजकारणापेक्षा बडबड करण्याचे राजकारण सुरू आहे. राजकारणात येऊ पाहणारी पिढी याकडे गंभीरपणे पाहत आहे. रोज सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर पकपक सुरू होते. यातून नवीन पिढ्या काय आदर्श घेणार? हे पाहून राजकारणात यायचे की नाही, याबाबत नवी पिढी संभ्रमात आहे.’’

Web Title: Maharashtra will not lose much if one or the other industry goes out Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.