Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! नाशिकला पारा १३ अंशावर, पुण्यातही थंडीमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:48 PM2024-11-14T12:48:20+5:302024-11-14T12:49:14+5:30

पुढील दोन-तीन दिवस राज्यात काही भागात पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे

maharashtra winter in nashik at 13 degrees increase in cold in Pune too | Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! नाशिकला पारा १३ अंशावर, पुण्यातही थंडीमध्ये वाढ

Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! नाशिकला पारा १३ अंशावर, पुण्यातही थंडीमध्ये वाढ

पुणे: गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकर कुडकुडत आहेत. शहरात बुधवारी (दि. १३) किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नाशिकला १३.४ अंशावर पारा होता. त्यामुळे राज्यामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे.

राज्यामध्ये काही भागांमध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. काही भागात अजून किमान तापमान हे २० अंशाच्या वरती नोंदवले जात आहे. कोकणात रत्नागिरीत किमान तापमान २२ अंशावर आहे, तर मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान २० अंशाच्या खाली नोंदवले जात आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, ’’विदर्भवगळता संपूर्ण महाराष्ट्रात दि. १४ ते १७ नोव्हेंबरला तीन दिवस ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरुपाच्या पावसाची शक्यता जाणवते. निरभ्र आकाशामुळे सध्या सकाळ - संध्याकाळी काहीशा वाढत्या थंडीला, फक्त या तीन दिवसांसाठी विराम मिळेल. हा वातावरणीय परिणाम विशेषकरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या जिल्ह्यातच अधिक जाणवेल. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात हा परिणाम जाणवणार नाही. रविवारी (दि. १७) पुन्हा थंडीसाठी स्थिती पूर्ववत होईल.’’

पुढील आठवडाभर महाराष्ट्रात दुपारचे कमाल व पहाटेचे किमान असे दोन्हीही तापमान हे सरासरीइतके राहून कमाल तापमान हे ३१, तर किमान तापमान १५ ते १७ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान राहील. अनेक भागात ढगाळ वातावरण राहील. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ

राज्यातील किमान तापमान

मुंबई : २३.५
पुणे : १४.६
नगर : १५.३
कोल्हापूर : १९.५
नाशिक : १३.४
सातारा : १६.५
सोलापूर : २०.६
नागपूर : १६.०
यवतमाळ : १५.०

Read in English

Web Title: maharashtra winter in nashik at 13 degrees increase in cold in Pune too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.