काश्मीरशी जुळणार महाराष्ट्राचे ‘रक्ताचे नाते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:53 AM2018-05-18T00:53:05+5:302018-05-18T00:53:05+5:30

काश्मीरमध्ये आपले भारतीय जवान संरक्षणासाठी रक्त सांडतात. म्हणून आपण सुरक्षित आहोत; पण या जवानांसाठी काश्मीरमध्ये रक्तासाठी दात्यांची वाट पाहावी लागते;

Maharashtra's blood relation with Kashmir | काश्मीरशी जुळणार महाराष्ट्राचे ‘रक्ताचे नाते’

काश्मीरशी जुळणार महाराष्ट्राचे ‘रक्ताचे नाते’

Next

- श्रीकिशन काळे 
पुणे : काश्मीरमध्ये आपले भारतीय जवान संरक्षणासाठी रक्त सांडतात. म्हणून आपण सुरक्षित आहोत; पण या जवानांसाठी काश्मीरमध्ये रक्तासाठी दात्यांची वाट पाहावी लागते; पण आता तेथे रक्त देण्यासाठी पुणे व महाराष्ट्रातून दात्यांची टीम जात आहे. खरं तर काश्मीर येथील जवानांसाठी पुण्यातून अनेक वर्षांपासून विविध प्रकारची मदत पुरविली जात आहे; पण आता पुण्याचे काश्मीरशी रक्ताचे नाते जुळणार आहे. तेथील लोकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी पुण्यातील ‘रक्ताचे नाते’ या संस्थेचे कार्यकर्ते तेथे जाऊन रक्तदान करणार आहेत.
काश्मीरमध्ये जवानांसाठी खूप रक्तलागते; परंतु तिथे तेवढे मिळत नाही. त्यामुळे तेथील लोकांना एक संदेश मिळावा म्हणून हे शिबिर श्रीनगर येथे घेण्यात येत आहे. त्यासाठी दोन-तीन महिन्यांपासून तयारी केली जात आहे. महाराष्ट्रातून २४, पंजाबमधून २० आणि इतर राज्यांमधून ३५ जण यामध्ये सहभागी होत आहेत. हे सर्व जण ‘रक्ताचे नाते’ या ट्रस्ट सोबत जोडलेले आहेत. विमानाने जाणार आहेत. कारण, रेल्वेने जाण्या-येण्यातच दोनचार दिवस जातात. म्हणून विमानाने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
याबाबत रक्ताचे नाते या संस्थेचे संस्थापक राम बांगड म्हणाले की, मी स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान करीत आहे. राज्यात व देशात रक्तदाते एकत्र केले आहेत. काश्मीरमध्ये काही जण काम करीत आहेत. त्यांचा आम्ही पुण्यात सन्मान केला होता. त्यांनी तेव्हा आम्हाला सांगितले की, तिकडे रक्त खूप लागते; पण लोकांमध्ये त्याबाबत जागरूकता नाही. तेव्हा आम्ही तेथे जाऊन रक्तदान करण्याचे ठरविले.
पुण्यातील लोकं काश्मीरमध्ये येऊन रक्तदान करीत आहेत. मग आपण का करत नाही, अशी भावना त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी आम्ही तिकडे जाण्याचे नियोजन केले. मी स्वत: तिथे रक्तदान आणि मार्गदर्शन करणार आहे. माझे १२४ वे रक्तदान असणार आहे. यापूर्वी अशा प्रकारे काश्मीरमध्ये जाऊन कोणी रक्तदान केलेले नाही. त्यामुळे हा एक वेगळा उपक्रम ठरणार आहे. श्रीनगरमध्ये चाइल्ड एज्युकेशन सोसायटी सर्व सोय करीत आहे.
श्रीनगरच्या जिल्हा रुग्णालयात हे रक्तदान होणार आहे. या अनोख्या उपक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, नागरिकांमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागविण्यासाठी हा खूप चांगला उपक्रम आहे.
>काश्मीरमध्ये रक्तदात्यांची वानवा
काश्मीरमध्ये रक्तदान करणारे लोक नाहीत. त्यामुळे तिथे नेहमी गरज लागते. जवानाला किंवा नागरिकाला रक्त लागत असेल, तर एखाद्या ट्रस्टच्या कार्यकर्त्याला बोलावले जाते; पण कोणी पुढे येत नाही.
त्यामुळे तेथील सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता
वाढावी, यासाठी आम्ही हा
उपक्रम घेत आहोत. आम्ही सर्व जात आहोत. आमच्यात सर्वजण
पदवीधर आणि इंजिनिअर आहेत. अनेक लोक
आताही तयार होत आहेत; पण आता विमानाचे तिकीट लगेच काढले तर खूप महाग पडते. त्यामुळे अनेकजणांना येता येणार नाही, असे राम बांगड म्हणाले.

Web Title: Maharashtra's blood relation with Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.