महाराष्ट्राची लोककला आजही समृद्ध - उल्हास पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:31 AM2017-11-29T03:31:30+5:302017-11-29T03:31:43+5:30
महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार पोहोचली, ती वाढली आणि आजही तितकीच समृद्ध झाली आहे. याच लोककलेने संपूर्ण देशाला मोहिनी घातली आहे. त्यामुळे लोककला कोठेही उपेक्षित नाही, असे मत उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे
हडपसर : महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार पोहोचली, ती वाढली आणि आजही तितकीच समृद्ध झाली आहे. याच लोककलेने संपूर्ण देशाला मोहिनी घातली आहे. त्यामुळे लोककला कोठेही उपेक्षित नाही, असे मत उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांनी येथे व्यक्त केले.
वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे कै. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने आयोजित २०व्या पुणे लावणी महोत्सवात आज ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ लावणी नृत्यांगनाच्या छाया खुटेगावकर यांना, लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणीगायिका नंदा सातारकर यांना व कै. पठ्ठे बापूराव यांचे पट्टशिष्य ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ शाहीर बाळासाहेब मालुसकर यांना उल्हास पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
या वेळी आमदार योगेश टिळेकर, प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे, उपाध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, विकास रासकर, श्रीधर जिंतीकर, संदीप घुले, बापू जगताप, मित्रावरुण झांबरे, भरत हगवणे, अशोक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश खांडगे म्हणाले, ‘‘लोककलेची श्रीमंती ही मोठी आहे. महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा आहे. तो आजही जपला जात आहे, हे अशा महोत्सवात नेहमीच पाहिला मिळते.’’
विजयता व कल्याणी नगरकर, रेश्मा व वर्षा परितेकर, कविता बंडनिर्मित ढोलकीचा खणखणाट अशा संगीत पार्टीच्या कलावंतांनी आपली कला लावणी महोत्सवात सादर केली. दीपक वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शंतनू जगदाळे यांनी आभार मानले.