महाराष्ट्राची ‘कळसूबाई’ ‘एफटीआयआय’ विद्यार्थ्याने नेले सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:57+5:302021-06-01T04:08:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणतं तर ‘कळसूबाई’ हे सर्वश्रुत आहे. हीच महाराष्ट्राची ‘कळसूबाई’ ...

Maharashtra's 'Kalsubai' 'FTII' student took overseas | महाराष्ट्राची ‘कळसूबाई’ ‘एफटीआयआय’ विद्यार्थ्याने नेले सातासमुद्रापार

महाराष्ट्राची ‘कळसूबाई’ ‘एफटीआयआय’ विद्यार्थ्याने नेले सातासमुद्रापार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणतं तर ‘कळसूबाई’ हे सर्वश्रुत आहे. हीच महाराष्ट्राची ‘कळसूबाई’ फिल्मस टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्याने सातासमुद्रापार पोहोचविली.

देवी कळसूबाईचा इतिहास, तिचे महिलांच्या जीवनातील महत्त्व, महाराष्ट्रीय संस्कृतीवर पडलेला त्याचा प्रभाव या सर्वांचा वेध घेणारा वीस मिनिटांचा माहितीपट ‘एफटीआयआय’च्या २०१७ बॅचच्या युधाजीत बसू या विद्यार्थ्याने तयार केला आहे. त्याच्या या माहितीपटाला जर्मनीतील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन स्पर्धेत विशेष सन्मान मिळाला आहे. विद्यार्थ्याच्या या माहितीपटाचे ज्युरीने कौतूक केले आहे.

बसू यांनी कळसूबाईचे दोन माहितीपट तयार केले आहेत. पहिल्या प्रकारात फोटोंचा वापर केला असून त्यामध्ये कळसूबाईच्या जुन्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. तर दुसऱ्या प्रकारात गाण्यांच्या स्वरूपात संवाद दाखवला आहे. त्यात भूतकाळ आणि वर्तमानातील घटनांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगा, कोकण, कळसूबाई सारखी शिखरे यांची वेगळीच संस्कृती आहे. शिखराची पूजा करणे, समुद्राला नारळ अर्पण करणे या परंपरांना भारतीय संस्कृतीत महत्त्व देण्यात येते. अशाच प्रकारे कळसूबाई शिखराची गावागावांत पूजा केली जाते. त्यावरूनच बसू यांनी प्रेरणा घेऊन कळसूबाई माहितीपट तयार केला.

चौकट

“मी एकदा माझ्या मित्रासोबत महाराष्ट्रातील संस्कृती जाणून घेण्यासाठी सर्वत्र फिरत होतो. तेव्हा माझ्यासाठी सगळे नवीनच होते. प्रत्येक ठिकाणी मला वेगवेगळ्या गोष्टी दिसू लागल्या. गावातील जनजीवन, स्त्रियांची शिकवण, पारंपरिक गोष्टींचा अभ्यास करण्याची उत्सूकता निर्माण झाली. असेच एकदा फिरताना एका व्यक्तीने कळसूबाई शिखरावर एक जण राहत असल्याची माहिती दिली. कळसूबाई हे उंच शिखर असून त्याचा इतिहास आणि संस्कृती जाणून घ्यायला आवडेल असे त्याला सांगितले. त्यानुसार कळसूबाई शिखरावर माहितीपट तयार करण्याचे ठरवले.”

-युधाजीत बसू, एफटीआयआय

Web Title: Maharashtra's 'Kalsubai' 'FTII' student took overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.