पुण्यातील सुखसागरनगरमध्ये होणार महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म. सा. यांचा चातुर्मास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:39 PM2018-01-06T14:39:42+5:302018-01-06T14:42:01+5:30
महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. कुंदनऋषीजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास सुखसागरनगर जैन श्रावक संघ येथे प. पू. म. सा. यांनी जाहीर केला. यावेळी सकल जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
बिबवेवाडी : महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. कुंदनऋषीजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास सुखसागरनगर जैन श्रावक संघ येथे प. पू. म. सा. यांनी जाहीर केला. यावेळी सकल जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प. पू. कुंदनऋषीजी म. सा., प. पू. पद्ममऋषीजी म. सा., प. पू. विशालऋषीजी म. सा., प. पू. आलोक ऋषीजी म. सा., प. पू.अचलऋषीजी म. सा., प. पू. हिमानीजी म. सा., प. पू. संबोधीजी म. सा., प. पू. आराध्याजी म. सा. आदी ठाणा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होते.
बिबवेवाडी श्रावक संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी नवीन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावर्षीचे होणारे सर्व चातुर्मास समाजाला नवी दिशा देणारे असतील. अनेक संत यावर्षी पुण्यात चातुर्मासानिमित्त येणार आहेत. त्यामुळे सर्वच संघाचे अध्यक्ष नवीन वर्ष सुरु झाल्यापासून चातुर्मासाच्या तयारीसाठी लागले आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी प. पू. म. सा. यांनी देखील नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत महामांगलिक दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, धनराज श्रीश्रीमाळ, माणिक दुगड, चंद्रकांत लुंकड, पन्नालाल पितळीया, कीर्तिर्राज दुगड, रामलाल संचेती, अविनाश कोठारी, गणेश ओसवाल, संपत भटेवरा, प्रवीण रांका, चंपालाल नहार यांच्यासह संघाच्या सर्व पदाधिकाºयांनी प्रयत्न केले.
संघाचे उपाध्यक्ष माणिक दुगड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार मानले.