महाराष्ट्रकन्यांचा विक्रमी सुवर्णवेध
By admin | Published: June 30, 2017 04:00 AM2017-06-30T04:00:27+5:302017-06-30T04:00:27+5:30
भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित ३४व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गुरूवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंची पदकांची लयलूट
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित ३४व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गुरूवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंची पदकांची लयलूट
कायम ठेवली. वेदिका अमीन, संजिती साहा आणि गोव्याचा शॉन गांगुली यांनी धडाकेबाज कामगिरी करताना विक्रमासह सुवर्णपदके जिंकली. ४ बाय ५० मीटर मिडले प्रकारात महाराष्ट्राच्या पलक धामी,
संजिती सहा, वेदिका अमिन,
अपेक्षा फर्नांडीस या संघाने नवा विक्रम नोंदविला. उत्कर्ष गोर यानेही सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णपदके जिंकली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या ११ ते १२ वर्षे वयोगटात २00 मीटर मिडले प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या संजिती सहाने २ मिनिटे ३८.१८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर तामिळनाडूच्या शक्ती बी व महाराष्ट्रच्या अपेक्षा फर्नांडीस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
मुलांच्या गटात गोव्याच्या
शॉन गांगुलीने २ मिनिटे २३.२० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. यासह नवा विक्रम नोंदवला. याआधी हा विक्रम पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडल (२.२६.७३) याच्या नावावर होता.
१०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या वेदिका अमिनने १ मिनिट १८.६३ सेकंदाचा वेळ नोंदवत नव्या विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. विशेष म्हणजे, वेदिकाने हे यश मिळवताना १.२0.८५ सेकंदांचा आपलाच विक्रम मागे टाकला. महाराष्ट्रच्या अपेक्षा फर्नांडीसने १.२२.७६ सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवले. मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या शुबोजीत गुप्ताने १.१७.५६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
१०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोरने १ मिनिट ७.१४ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली तर मुलींच्या गटात आसामच्या जहानबी कश्यपने १.०७.२७ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.
५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या साहिल लष्करने स्वता:चाच ३१.५१ सेकंदाचा विक्रम मोडीत
काढत ३०.९६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. तर मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या पलक धामीने ३३.११ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले.
५० मीटर बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोरने ३२.१९ सेकंदाचा वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर मुलींच्या गटात कर्नाटकच्या रिशिका मांगलेने ३३.३९ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.
५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या ९ ते १० वर्षे वयोगटात महाराष्ट्राच्या वेदिका अमिन व संजिती सहा या दोघींनीही २८.९0 सेकंद वेळ नोंदवली त्यामुळे दोघींनाही सुवर्णपदक देण्यात आले. तर हिमाचल प्रदेशच्या नैना ग्रेवालने २९.८६ सेकंद वेळेसह कांस्य पदक पटकावले. त्यापूर्वी सकाळी झालेल्या हिट्समध्ये वेदिकाने गुजरातच्या माना पटेलचा २०१२ चा 0.२९.४१ सेकंदाचा विक्रम मोडला. सायंकाळी झालेल्या अंतिम फेरीत तीने स्वत:चा विक्रम मोडला. आता हा विक्रम वेदिका व संजिती या दोघींच्याही नावावर नोंदला गेला आहे.
४ बाय ५० मीटर मिडले प्रकारात मुलींच्या ११ ते १२ वर्षे वयोगटात महाराष्ट्रच्या पलक धामी, संजिती सहा, वेदिका अमिन, अपेक्षा फर्नांडीस या संघाने २.१.३४ सेकंदासह नवीन विक्रम नोंदवत वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. याआधी महाराष्ट्र संघाचा २.१४.८६ सेकंद वेळेचा विक्रम होता.