महाराष्ट्रच्या वाट्याला १७४ मेट्रिक टन पोहोचला प्राणवायू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:31+5:302021-05-08T04:11:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्णांसाठी ‘श्वास’ ठरलेल्या भारतीय रेल्वेच्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने आतापर्यंत संपूर्ण देशांत ४७ ऑक्सिजन एक्स्प्रेस ...

Maharashtra's share of oxygen reached 174 metric tons | महाराष्ट्रच्या वाट्याला १७४ मेट्रिक टन पोहोचला प्राणवायू

महाराष्ट्रच्या वाट्याला १७४ मेट्रिक टन पोहोचला प्राणवायू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना रुग्णांसाठी ‘श्वास’ ठरलेल्या भारतीय रेल्वेच्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने आतापर्यंत संपूर्ण देशांत ४७ ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविल्या. यातूनन देशभरात २९६० मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक झाली. सर्वात जास्त टँकर दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये पोहोचविण्यात आले, तर महाराष्ट्रात आतापर्यंत ऑक्सिजनचे १० टँकर आले. यातून महाराष्ट्राला १७४ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला. यात नाशिक व नागपूर शहरांचा समावेश आहे.

राज्यासह देशात ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाल्यानंतर भारतीय रेल्वेने विविध राज्यांच्या मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा जलद व सुरक्षित करण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यास सुरुवात केली. यासाठी विशाखापट्टणम, अंगुल, बोकारो, राऊरकिला आदी ठिकाणच्या प्लान्टमधून ऑक्सिजनची वाहतूक सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे.

चौकट

कोणत्या राज्यांना किती मिळाले

महाराष्ट्र १७४ मेट्रिक टन

उत्तर प्रदेश ७२९ मेट्रिक टन

मध्य प्रदेश २४९ मेट्रिक टन

हरियाणा ३०५ मेट्रिक टन

तेलंगणा १२३ मेट्रिक टन

दिल्ली १३३४ मेट्रिक टन

चौकट

ऑक्सिजन एक्स्प्रेसची सुरुवात महाराष्ट्रातून

देशात पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेसला सुरुवात झाली ती कळंबोली गुड्स शेडहून. पण आतापर्यंत महाराष्ट्र केवळ दोनच ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल झाल्या आहेत. पहिली विझागहून नागपूर व नाशिक येथे दाखल झाली. त्यानंतर हापा येथून दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोली येथे दाखल झाली. आतापर्यंत राज्यात १० टँकर आले आहे.

कोट

राज्याच्या मागणीनुसार रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेसचा पुरवठा केला. शुक्रवारी रात्री नागपूरला ऑक्सिजनचे चार टँकर येणार आहे.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

Web Title: Maharashtra's share of oxygen reached 174 metric tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.