महर्षी कर्वे पुतळ्याचे होणार सुशोभीकरण

By admin | Published: January 11, 2017 03:29 AM2017-01-11T03:29:04+5:302017-01-11T03:29:04+5:30

कोथरूडमध्ये असलेल्या महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण डिजिटल आर्किटेक्चर पद्धतीने केले जाणार आहे. नव्या भव्य पुतळ्याच्या स्मारकामुळे कोथरूडच्या आकर्षणात भर पडणार आहे.

Maharishi Karve statue will be beautified | महर्षी कर्वे पुतळ्याचे होणार सुशोभीकरण

महर्षी कर्वे पुतळ्याचे होणार सुशोभीकरण

Next

पुणे : कोथरूडमध्ये असलेल्या महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण डिजिटल आर्किटेक्चर पद्धतीने केले जाणार आहे. नव्या भव्य पुतळ्याच्या स्मारकामुळे कोथरूडच्या आकर्षणात भर पडणार आहे.
या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राजन गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. स्मारकाची संकल्पना माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची होती. देशात या पद्धतीने प्रथमच स्मारक उभारण्यात येत असल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली.
बीएनसीए डिजिटल आर्किटेक्चर विभागाचे प्राध्यापक आर्किटेक्ट स्वप्निल गवाडे, धनश्री सरदेशपांडे व विद्यार्थ्यांनी मिळून या स्मारकाचे डिझाईन केले आहे. त्यात महर्षी कर्वेंच्या विचारांना प्राधान्य देण्यात आले आहे. या स्मारकासाठी ५५ लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती नगरसेवक अ‍ॅड़ योगेश मोकाटे यांनी दिली. या वेळी संस्थेचे संचालक जयंत इनामदार, विद्या देशपांडे, किरण बराटे, डॉ. पी. व्ही. शास्त्री, तसेच देशमुख, प्रा. कश्यप, दीपक ठेलवान, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या कल्पनाचित्रास कल्पवृक्ष असे नाव दिले आहे. या कल्पवृक्षाची मुळे म्हणजेच महर्षी कर्वे यांची संपूर्ण जीवनशैली व विचार; खोड म्हणजे स्वत: अण्णा कर्वे; या वृक्षाच्या फांद्या म्हणजे त्यांच्या विचारांमुळे समाजाला झालेला फायदा व बदल; त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित कायार्मुळे ज्या विविध संस्था निर्माण झाल्या त्यांना छोट्या फांद्या असे संबोधता येईल आणि या कल्पवृक्षाची पाने, फुले आणि फळे म्हणजे जागतिक दर्जाचे विद्यार्थी, ज्यांना अण्णा कर्वे यांच्या नावाशी संबंधित असल्याचा सार्थ अभिमान आहे. अशा प्रकारे अण्णा कर्वेंच्या विचारांचा हा कल्पवृक्ष स्मारकाद्वारे मांडण्यात येणार आहे. या रचनेचे रेखाचित्र अत्याधुनिक प्रचलीय वास्तुरचना शास्त्राचा वापर करून बनविलेले आहे आणि त्यामधून महर्षी कर्वेंचे अत्याधुनिक व भविष्यवादी विचार प्रदर्शित होतात.  या रचनेत षट्कोनी समभाग दाखविलेले असून, प्रत्येक षट्कोनाच्या अग्रभागी दिवे लावलेले आहेत.
४महर्षी धोंडो केशव कर्वे,यांनी कायम पुरातन अंधश्रद्धेच्या रूढी व परंपरांविरुद्ध लढा दिला आणि त्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या शिल्पाकृतीचे सुशोभीकरण करताना प्रचलित आणि गतकाळाच्या रचनाकृतींना छेद देणे गरजेचे होते.
४विभागाचे प्राध्यापकवृंद आर्किटेक्ट स्वप्निल गवांदे, धनश्री सरदेशपांडे आणि विद्यार्थिनी यांनी मिळून महर्षी कर्वे यांच्या क्रांतिकारी विचारांना अनुसरून कल्पनाचित्र आरेखित केले आहे.

Web Title: Maharishi Karve statue will be beautified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.