जेजुरीतील महारोजगार मेळावा रद्द; कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळल्याने निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 05:15 PM2023-07-12T17:15:47+5:302023-07-12T17:16:47+5:30

हा रोजगार मेळावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार होता....

Maharoja Mela in Jejuri cancelled; The verdict as the skeleton of the event shed collapses? | जेजुरीतील महारोजगार मेळावा रद्द; कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळल्याने निर्णय?

जेजुरीतील महारोजगार मेळावा रद्द; कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळल्याने निर्णय?

googlenewsNext

पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांचेमार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जेजुरी येथे १३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. पण पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. महारोजगार मेळाव्याची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार होता. तसेच 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. पण या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडचा सांगाडा रात्री कोसळला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

तीर्थक्षेत्र जेजुरीत गुरुवारी' शासन आपल्या दारी' आणि जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. त्यासाठी जेजुरीतील पालखी तळावर भव्य दिव्य असा मंडप टाकण्याचे काम सुरू होते. साधारणपणे १ लाख ५७ हजार क्वेअर फूट क्षेत्रफळाचा व सुमारे २१ हजार लोकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात येत होता. गेले आठवडाभर याचे काम युद्ध पातळीवरून सुरू होते. मुख्य व्यासपीठ आणि त्यासमोर व्हीआयपी कक्ष त्याच्या मागच्या बाजूला लाभार्थ्यासाठी मंडप उभारला जात होता. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास या कक्षाच्या मंडपसाठी लोखंडी पिलर उभारून सांगाडा तयार करण्यात आला होता. सांगाडा पूर्ण उभारल्यानंतर कामगार झोपण्यासाठी गेले असता हा संपूर्ण सांगाडा अचानक कोसळला. सांगाड्याखाली कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र कार्यक्रमापूर्वीच सांगाडा कोसल्याने भविष्यातील मोठा अनुचित प्रकार टळल्याची चर्चा आहे.
 
रात्रंदिवस मंडप उभारणीचे काम सुरू असल्याने कामगारांना अजिबात विश्रांतीही मिळत नाही. रात्री ३ वाजता सांगाडा कोसळल्यानंतर ठेकेदाराने रातोरात सांगाडा उभा करण्यासाठी  कामगारांना कामाला लावले होते. सकाळपर्यंत कोसळलेला संपूर्ण सांगाडा खोलून पुन्हा उभारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही काम करून झोपायला गेलो असता दहा मिनिटातच सांगाडा कोसळल्याचे तेथील कामगारांनी सांगितले.

Web Title: Maharoja Mela in Jejuri cancelled; The verdict as the skeleton of the event shed collapses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.