नारायणेश्वर मंदिरात महाशिवरात्र साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:46+5:302021-03-13T04:17:46+5:30
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे प्रसिध्द दत्त मंदिराचे शेजारी असलेल्या ऐतिहासिक नारायणेश्वर मंदिरात रात्री १२ वाजता शिवलिंगाची पूजा ...
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे प्रसिध्द दत्त मंदिराचे शेजारी असलेल्या ऐतिहासिक नारायणेश्वर मंदिरात रात्री १२ वाजता शिवलिंगाची पूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे चार वाजता पोपट बोरकर महाराज, अरुण बोरकर, योगेश तावडे, दत्ता गोळे, भरत बडदे, ग्रामस्थ व सेवेकरी मंडळ यांच्या उपस्थितीत पिंडीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मोजक्या लोकांच्यातच भाविकांनी महादेवांचे दर्शन घेतले.
यावेळी भरतनाना क्षीरसागर, सरपंच चंद्रकांत बोरकर, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, भुजंग बोरकर, श्रीनाथ बोरकर, अरुण बोरकर, सदानंद बोरकर, चंदू बोरकर, दिगंबर भिंताडे, भीमसेन बोरकर, मारुती बोरकर, रामदास बोरकर आदी उपस्थित होते. रात्री कावडीतील रांजणात पाणी भरुन या रांजणाची म्हणजे कावडीची व काठीची नारायणेश्वर मंदिराला पाच प्रदक्षिणा झाल्या. या प्रदक्षिणेनंतर या रांजणातील पाणी रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत महादेवांच्या लिंगावर टाकण्यात आले.
त्यानंतर रात्री भैरवनाथ मंदिर येथून पालखीचे आगमन नारायणेश्वर मंदिरात झाले. येथे ठराविक लोकांच्यात छबिना कार्यक्रम होऊन पुन्हा पालखी भैरवनाथ मंदिरात विसावली.
फोटोः नारायणपूर (ता. पुरंदर) येथील नारायणेश्वर मंदिरात शिवलिंगा जवळ फुलांची करण्यात आलेली सजावट.