येरवड्यातील तारकेश्वर टेकडीवरील महाशिवरात्री उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:20+5:302021-03-10T04:13:20+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन धार्मिक उत्सवांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.दरवर्षी या ...

Mahashivaratri festival on Tarkeshwar hill in Yerwada canceled | येरवड्यातील तारकेश्वर टेकडीवरील महाशिवरात्री उत्सव रद्द

येरवड्यातील तारकेश्वर टेकडीवरील महाशिवरात्री उत्सव रद्द

Next

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन धार्मिक उत्सवांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक शहरासह राज्यभरातून येत असतात. धार्मिक- पूजा विधी, अभिषेक यांच्यासह या संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते.

सालाबाद प्रमाणे तारकेश्वर मंदिर या ठिकाणी होणारा महाशिवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या नियमानुसार केवळ मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक पूजाविधी केले जाणार आहेत. कोणत्याही प्रकारचा उत्सव होणार नसून मंदिरातील दर्शन देखील बंद राहणार आहे. सदरचा उत्सव रद्द केल्या बाबत येरवडा व परिसरातील मुख्य चौकांमध्ये फलक लावण्यात येणार आहेत. त्याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन समस्त गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Mahashivaratri festival on Tarkeshwar hill in Yerwada canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.