'महासुख' टी कंपनीची 'अमृततुल्य' चहा रेसिपी पॅकेट्स; रेस्टॉरंट, कॅफेमध्ये करता येईल वापर: आदिश शाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 07:10 PM2023-05-30T19:10:07+5:302023-05-30T19:10:31+5:30
देशात आज चहाचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. याचे मुख्य कारण चहाच्या व्यवसायात छोट्या गुंतवणुकीत मोठा नफा मिळतो
पुण्यातील प्रसिद्ध चहाचे होलसेल व्यापारी 'महासुख' टी कंपनीने अमृततुल्य, रेस्टॉरंट, कॅफे, केटरर्स यांच्यासाठी चहा रेसिपीची पॅकेट्स बाजारात आणली आहेत. त्यामुळे ते देखील आता नामांकित फ्रँचायझीप्रमाणेच आपल्या ग्राहकांना चहाची चव देऊ शकतात. 'चहा' हे जगप्रसिद्ध आणि सर्वांना आवडणारं, मनाला तजेला देणारं पेय आहे. भारतातील ८० टक्के लोक चहा पितात. दिवसाची सुरुवातच चहापासून होते असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
देशात आज चहाचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. याचे मुख्य कारण चहाच्या व्यवसायात छोट्या गुंतवणुकीत मोठा नफा मिळतो. आज 'अमृततुल्य 'चहा दुकानाच्या व्यवसायातून अनेक लोक लाखो रुपये कमावत आहेत. पण नवीन व्यवसाय अथवा कोणतीही नवीन फ्रँचायझी घेण्यासाठी १० ते १२ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
पुण्याच्या मार्केट यार्ड मधील 'महासुख' टी कंपनीने अमृततुल्य चहाची रेसिपी तयार करून या समस्येवर उपाय शोधला आहे. या रेसिपी पॅकेट्सचा वापर करून आपल्या चवीचा चहा माफक दरात बनविता येतो. प्रत्येक बॅचमध्ये सारख्याच चवीचा चहा बनवला जाईल आणि या रेसिपी पॅकेट्सची किंमत फक्त २७ रुपयांपासून सुरू होते. म्हणजे आता १० - १२ लाखांऐवजी, नामांकित फ्रँचायझी सारखीच चव फक्त २७ रुपये आहे. एका पॅकेट्समध्ये एक लिटर म्हणजे ६० मिलीचे १६ कप चहा तयार होईल. या रेसिपी चहामध्ये अमृततुल्य, गुळाचा चहा, लेमन टी आणि ब्लॅक टी असे ४ - ५ फ्लेवर्स आहेत.
'महासुख' टी कंपनीने १९८० मध्ये व्यवसाय स्थापन करून आपला चहाचा ब्रँड निर्माण केला आहे. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नामांकित अमृततुल्य ब्रँड्सना रेसिपी पॅकेटचा पुरवठा करीत आहे. महासुख कंपनीचे आदिश शाह हे भारतातील अधिकृत चहा टेस्टर असून त्यांनी देशात मोठ्या प्रमाणात चहाच्या पुरवठा करणाऱ्या वितरकांना आपल्या रेसिपी सेट करून व्यवसाय उभे केले आहेत. अधिक माहितीसाठी महसुख टी कंपनी, ३८९, मार्केट यार्ड, गेट नं. ४, पुणे. ४११३०७. यावर संपर्क साधावा.
'महासुख' चहाचे आदिश शाह सांगतात की, "आता चहाच्या व्यवसायासाठी १०-१२ लाखांची गुंतवणूक करण्याची गरज नाही, लहान-मोठे रेस्टॉरंट आणि कॅफे त्यांच्या दुकानात महासुख चहाची अमृततुल्य रेसिपी चहाची पाकिटे वापरू शकतात. चहाची विक्री आणि नफा वाढवू शकतात."