बेल्हा येथे महास्वच्छता अभियानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:46+5:302021-09-26T04:10:46+5:30

यावेळी ग्रामपंचायत परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बसस्थानक, मंदिरांचा परिसर, मस्जिद, शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक शौचालये, कचराकुंड्या यासह संपूर्ण गावात ...

Mahasvachchata Abhiyan begins at Belha | बेल्हा येथे महास्वच्छता अभियानास सुरुवात

बेल्हा येथे महास्वच्छता अभियानास सुरुवात

Next

यावेळी ग्रामपंचायत परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बसस्थानक, मंदिरांचा परिसर, मस्जिद, शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक शौचालये, कचराकुंड्या यासह संपूर्ण गावात हे महास्वच्छता अभियान राबविले गेले. या अभियानाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर न टाकण्याचेही आवाहन करण्यात आले. अभियानात सरपंच गोरक्षनाथ वाघ, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बेंद्रे, ग्रामपंचायत सदस्य राकेश डोळस, बबन औटी, लिलावती बोरचटे, निकीता भुजबळ, रंजना पिंगट व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

प्रदूषण व रोगमुक्त माझा गाव व्हावा या हेतूने व जिल्हा परिषद व पंचायत समिती जुन्नर यांच्या सहकार्याने या महास्वच्छता अभियानास सुरुवात झाली असून, प्रत्येक नागरिकाने आपापले घर व परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी केले.

Web Title: Mahasvachchata Abhiyan begins at Belha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.