Drugs Case: पाठराखण करण्याच्या नादात 'मविआ' सरकार व्हिलन बनले, चित्रा वाघ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 03:47 PM2021-10-24T15:47:49+5:302021-10-24T15:48:02+5:30

चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

mahavikas agahdi sarakar government became a villain in the wake of the follow-up, criticized Chitra Wagh | Drugs Case: पाठराखण करण्याच्या नादात 'मविआ' सरकार व्हिलन बनले, चित्रा वाघ यांची टीका

Drugs Case: पाठराखण करण्याच्या नादात 'मविआ' सरकार व्हिलन बनले, चित्रा वाघ यांची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देएनसीबीने फक्त हेरॅाईन नव्हे तर नेत्यांच्या - अभिनेत्यांच्या हिरोंना पकडले

पुणे : सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे 'हेरॉईन' पकडले होते पण त्यात 'हिरोईन'चा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला होता. त्यावरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. 

वाघ म्हणाल्या, ''एनसीबीने फक्त हेरॅाईन नव्हे तर नेत्यांच्या - अभिनेत्यांच्या बिघडलेल्या हिरोंना पण पकडलंय. त्यांची पाठराखण करण्याच्या नादात महाविकास आघाडी सरकार व्हिलन बनले आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.'' 

अंमली पदार्थप्रकरणी कारवाईबाबत काय म्हणाले होते मुख्यमंत्री (Uddhav Thackeray)

''सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे.' तसेच, केंद्रातील तपास युनिटच या प्रकरणांचा तपास लावू शकतात, असे नाही. तर, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे 'हेरॉईन' पकडले होते पण त्यात 'हिरोईन'चा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला होता.'' 

नागपूर येथे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत निर्भया योजनेंतर्गत जलदगती डीएनए विश्लेषण विभाग आणि राज्यातील एकमेव अशा वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची उपस्थिती होती. यवबेली ते बोलले होते.  

Web Title: mahavikas agahdi sarakar government became a villain in the wake of the follow-up, criticized Chitra Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.