शेतकरी काळ्या कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:05+5:302021-03-27T04:11:05+5:30

आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे शांतपणे ...

Mahavikas Aghadi agitation against farmers black law | शेतकरी काळ्या कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

शेतकरी काळ्या कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

googlenewsNext

आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे शांतपणे आंदोलन चालू आहे. केंद्र सरकार विविध मार्गांचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच वाढलेल्या किंमतीबाबत केंद्र सरकार जबाबदार असल्याचे मत काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष साहिल केदारी यांनी व्यक्त केले.

आंदोलनाप्रसंगी नगरसेविका संगीता ठोसर, नगरसेवक हाजी गफूरभाई पठाण, हडपसर विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष नारायण लोणकर, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, हडपसर विधानसभा शिवसेना अध्यक्ष राजेंद्र बाबर, माजी नगरसेवक भरत चौधरी, प्रसाद बाबर, देवदास लोणकर, सचिन कापरे, शंकर लोणकर, केविन मॅन्युअल, विशाल गिरमे, प्रसाद चौघुले, गणेश कामठे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

---------------------

फोटो : केंद्र सरकार विरोधात आंदोलन व निषेध मोर्चा करण्यात आला.

Web Title: Mahavikas Aghadi agitation against farmers black law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.