महाविकास आघाडी सरकारने राज्याचा तमाशा केलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 02:13 PM2021-03-21T14:13:56+5:302021-03-21T14:16:11+5:30

चंदकांत पाटील यांची राज्य सरकारवर उपरोधिकपणे टीका

Mahavikas Aghadi government has made a spectacle of the state: Chandrakant Patil | महाविकास आघाडी सरकारने राज्याचा तमाशा केलाय

महाविकास आघाडी सरकारने राज्याचा तमाशा केलाय

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष ठाकरेंना अडचणीत आणत आहे

सरकार मनसुख हिरेन, सचिन वाझे ही प्रकरणे दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र पोलिसही आघाडीच्या दबावाखाली आले आहेत. राज्य चालवणे आता सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. आम्ही तमाशा बघायला जमलोय पण साक्षात सिनेमातला प्रसंग घडत आहे. या सरकारने राज्याचा तमाशा करून टाकलाय. अशी उपरोधिकपणे टीका चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर केली आहे. 

सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, मनसुख हिरेन यांचा ज्या ठिकाणी मृतदेह सापडला. त्याच ठिकाणी दुसरी बॉडी आढळली. एवढी मोठी घटना हे सरकार दाबून टाकत आहे. ही लज्जास्पद बाब आहे. वाझेनी दरमहा १०० कोटी जमवून द्यावेत. असे देशमुख यांनी त्यांना सांगितले होते. असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. वाझे अजून काहीच बोलत नाहीयेत. म्हणजे हे खरं असण्याची शक्यता आहे. याची खोल चौकशी होत नाही. 

ठाकरे आमचे मित्र
सरकारमध्ये सगळी घोटाळेबाजी चालू आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष ठाकरेंना अडचणीत आणत आहे. त्यामुळे अशा प्रकरणाची मुख्यमंत्री सखोल चौकशी करत नाहीत. 
  
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा 
राज्यपाल जर तत्वनिष्ठ असतील, तर राज्यपाल राष्ट्रपतींना माहिती देतील. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडलीये. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी. 


 

 

Web Title: Mahavikas Aghadi government has made a spectacle of the state: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.