आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार : संजय राऊतांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 04:03 PM2021-02-20T16:03:13+5:302021-02-20T16:04:17+5:30
पदवीधर निवडणुकांच्या वेळी तीनही पक्ष एकत्रित लढल्याने भाजपला फटका बसू शकतो सिद्ध झाले आहे...
पुणे : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वतंत्र लढणार यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. तेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपला सत्ता मिळू नये म्हणून कितीही पक्ष एकत्र येतील असा दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता महाविकासआघाडी महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा एकत्र येण्याची संकेत दिले आहे.
आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार आहे, असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले. पुण्यामध्ये शनिवारी( दि.२०) राऊत यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
राऊत म्हणाले, "महापालिका निवडणुकीत जास्त व ती मान्य करून त्यांनी पक्ष जागा वाटप करून एकत्रित निवडणुका कशा लढवल्या जातील याचा विचार करू". तिथे त्यांची ताकद जास्त तिथे त्यांचे नेतृत्व हे धोरण ठेवत उदाहरण द्यायचं तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल हे पाहू असे राऊत म्हणाले.
पदवीधर निवडणुकांच्या वेळी तीनही पक्ष एकत्रित लढल्याने भाजपला फटका बसू शकतो सिद्ध झाले आहे. त्यामुळे वर्षभरावर आलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये हे पक्ष एकत्रित लढणार का याबाबत चर्चा सुरू होती. आता राऊत यांनी एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
विरोधकांनी धार्मिक राजकारण करत मंदिरे उघडायला लावली. आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत हे आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांची वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद साधला. त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपला संवाद आहेच. त्यांची मुलाखत होणार आहे पण पेपर न होता रिझल्ट बघायला मिळेल असं राऊत म्हणाले.