महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात

By admin | Published: April 10, 2017 03:07 AM2017-04-10T03:07:23+5:302017-04-10T03:07:23+5:30

अहिंसेचे अवतार भगवान महावीर यांची २६१५वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली

Mahavir Birth Centers Welfare Festival | महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात

महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात

Next

बिबवेवाडी : अहिंसेचे अवतार भगवान महावीर यांची २६१५वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जगा आणि जगू द्या, अहिंसा परमो धर्म, भगवान महावीर स्वामी की जय या घोषणांनी सकाळी ७.३० पासून शहर दणाणून गेले होते.
शहरातील प्रत्येक संघाच्या वतीने रथामधून वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली होती. तर अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, पाणपोईचे उद्घाटन, अनाथ आश्रमांना मदत, अनाथ आश्रमामध्ये जेवण, मोफत आरोग्य शिबिर, भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. बिबवेवाडी श्रावक संघ, आदिनाथ श्रावक संघ, दक्षिण पुणे श्रावक समिती, दत्तनगर श्रावक संघ, धनकवडी श्रावक संघ, कात्रज-कोंढवा रस्ता श्रावक संघ, प्रतिभा नवकार ग्रुप, आनंद दर्शन युवा मंच, संभव नाथ युवक मंडळ, सादडी सदन, महावीर प्रतिष्ठान अशा अनेक ठिकाणी तसेच विविध मंदिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक जैन स्थानकांत व मंदिरामध्ये साधुसंतांच्या सान्निध्यात महावीर जयंती साजरी करण्यात आली.
शहरामध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांना महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, बाळासाहेब ओसवाल, प्रकाश कदम, वसंत मोरे, राजाभाऊ कदम, कविता वैरागे, राजश्री शिळिमकर, भरत वैरागे, अ‍ॅड. अभय छाजेड, माणिकचंद दुगड, विजयकांत कोठारी, बाळासाहेब धोका, अभय संचेती, विजय भंडारी, राजेश सांकला, गौतम गेल्डा, अनिल भन्साळी, पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, रमणलाल लुंकड, चंद्रकात लुंकड, पारसमल लुंकड, ओमप्रकाश रांका, विजयराज मेहता, हिरालाल छाजेड, लक्ष्मीकांत खाबिया, भरत भुरट, संतोष जैन, उमेश मांडोत, महेंद्र सुंदेचा मुथ्था, राजभाई भन्साळ, कीर्तीराज दुगड, रसिकलाल नहार, मनोज छाजेड, ललित जैन, राजकुमार लोढा, अशोक लोढा, अशोक हिंगड, अनिल नहार, राजेश नहार, सचिन टाटिया, विजय नवलाखा, राजकुमार गांधी, भरत चंगेडे, दिनेश राठोड, मनोज लुंकड, प्रकाश नहार, अभय लुणावत, किशोर पिरगळ, महावीर काठेड, रतन बाबेल, अमित नहार, उमेदमल धोका, महेंद्र दुगड, पृथ्वीराज धोका, विजयकुमार मर्लेचा, संतोष पारख, कांतीलाल बाफना, शांतीलाल बाफना, तरुण मोदी, रायचंद खिंवसरा, राजमल भन्साळी, पुष्पा कटारिया, विमल बाफना, विलास राठोड, रामलाल शिंगवी, प्रफुल्ल कोठारी, किरण बोरा, ललित ओसवाल, अजय मेहता यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Mahavir Birth Centers Welfare Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.