महावितरण कर्मचा:याची बॅग लंपास
By admin | Published: September 18, 2014 12:20 AM2014-09-18T00:20:51+5:302014-09-18T00:20:51+5:30
लातूरहून मुंबईकडे निघालेल्या महावितरणच्या कर्मचा:याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन चोरटय़ांनी पोबारा केल्याची घटना दौंड रेल्वे स्थानकावर बुधवारी पहाटे घडली.
Next
दौंड : लातूरहून मुंबईकडे निघालेल्या महावितरणच्या कर्मचा:याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन चोरटय़ांनी पोबारा केल्याची घटना दौंड रेल्वे स्थानकावर बुधवारी पहाटे घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी या घटनेची चोरीची तक्रार न नोंदवता केवळ बॅग गहाळ झाल्याची नोंद करून आपली जबाबदारी झटकली आहे.
मनोज हेंगणो (वय 27, रा. औसा, ता. औसा, जि. लातूर) हे महावितरणच्या लातूर परिमंडल कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. ते मुंबई येथील मुख्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी 9 ते 1क् कर्मचा:यांबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीसंबंधीची मूळ कागदपत्रे घेऊन लातूर-मुंबई एक्स्प्रेसने मंगळवारी रात्री निघाले होते. बुधवारी पहाटे साडेतीन ते पावणोचारच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकावर ही गाडी येताच गाडीत आधीच दबा धरून बसलेल्या चोरटय़ाने हेंगणो यांच्याकडील बॅग हिसकावली आणि ते गाडीतून उतरून रूळ ओलांडून धावू लागला. हेंगणो यांनी त्या चोरटय़ाचा पाठलाग केला. परंतु त्या चोरटय़ाचा साथीदार आधीच मोटारसायकल घेऊन तयार होता. दोघेही मोटारसायकलवरून अंधाराचा फायदा घेत पळून गेले. या बॅगमध्ये महावितरणची महत्त्वाची कागदपत्रे आहेत, ‘पैसे घ्या; पण बॅग टाकून द्या’ असे हेंगणो यांनी चोरटय़ांना विनवण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. बॅगेत हेंगने यांचा मोबाइल, 5क्क् रुपये रोख, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक असा ऐवज होता.
4हेंगणो यांनी या घटनेची फिर्याद देण्यासाठी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी चोरीची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार देत केवळ बॅग गहाळ झाल्याची नोंद केली. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून.