महावितरणचा नखरा, वीजग्राहक मारतोय चकरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:31 AM2018-05-10T02:31:19+5:302018-05-10T02:31:19+5:30
महावितरणच्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उपविभागाच्या कारभारावर परिसरातील शेतकरी व वीजग्राहकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यालयात गेल्या दोन महिनांपासून कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता या पदाची व्यक्तीच नाही.
उरुळी कांचन : महावितरणच्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उपविभागाच्या कारभारावर परिसरातील शेतकरी व वीजग्राहकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यालयात गेल्या दोन महिनांपासून कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता या पदाची व्यक्तीच नाही. सहायक अभियंत्यावर अतिरिक्त भार देऊन सध्या या कार्यालयाचा कारभार कासवगतीने चालू आहे. त्यामुळे कामकाजाला गती नाही, ठोसपणा नाही व ग्राहकांच्या तक्रारींना न्याय नाही अशी काहीशी अवस्था या ठिकाणी झाली आहे.
या कार्यालयाच्या अखत्यारीत वळती फिडर व कोरेगाव मूळ फिडर; तसेच काहीवेळा अन्य ठिकाणचा घेतलेला वीजप्रवाह ग्राहकांसाठी वापरण्यात येतो. पण, यामधून मिळणारा वीजप्रवाह हा कधीच संतुलित दाबाने ग्राहकाला मिळत नसल्याने त्याच्या टीव्ही, फ्रीज, संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जळण्याने नुकसान होत आहे.
दखल नाही
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाने व गैरकारभाराने ग्राहकांच्या या तक्रारीची कोणीच दाखल घेत नाही, हे वास्तव आहे. महावितरणकडून पुरविण्यात येणारा वीजप्रवाह संतुलित दाबाने पुरविला जावा, अशी मागणी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजी कांचन व ननावरेवस्ती परिसरातील त्रस्त झालेले नागरिक बाळासाहेब जवळकर यांनी केली आहे.
उरुळी कांचन उपविभाग : कारभारावर ग्राहकांची नाराजी
महावितरणकडून ग्राहकांना चुकीची वीजबिले जाण्याचा प्रकार येथे सर्रास चालू आहे. कार्यालयात वीजबिलाच्या दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांना तात्पुरती वीजबिल दुरुस्ती करून मिळते, मात्र दुसºयाच महिन्यात पुन्हा चुकीचे वीजबिल त्याच ग्राहकाला मिळत असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कामकाजावर तीव्र नाराजी
सातत्याने वाढीव वीजबिले देणे, ती दुरुस्त करण्यास विलंब करणे किंवा ही माहिती आणा, ती माहिती आणा म्हणत हेलपाटे मारायला लावणे, वीजपुरवठ्यातील सतत होणारा खंड, कोणत्याही प्रकारच्या तक्रार निवारणास विलंब वा टाळाटाळ, नवीन वीजकनेक्शनसाठी कार्यालयात माराव्या लागणाºया फेºया, अनामत रक्कम भरूनदेखील वीजजोड देण्यात होणारा विलंब, ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीसाठी पाहावी लागणारी १५ दिवस ते महिनाभराची वाट, अशा विविध समस्यांमुळे येथील वीज ग्राहकांनी महावितरणच्या
अधिकारी व कर्मचाºयांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत प्रश्नचिन्ह उभे केले आहे.