Mahavitaran: लाखांपेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; वीजबिलांची थकबाकी तब्बल २ हजार कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 06:06 PM2021-10-12T18:06:49+5:302021-10-12T18:07:17+5:30

(electricity bill) घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा इतर अकृषक वर्गवारीतील थकबाकीदार आहेत

mahavitaran power outages of more than lakhs of consumers electricity bill arrears of Rs 2,000 crore | Mahavitaran: लाखांपेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; वीजबिलांची थकबाकी तब्बल २ हजार कोटींच्या घरात

Mahavitaran: लाखांपेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; वीजबिलांची थकबाकी तब्बल २ हजार कोटींच्या घरात

Next
ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम आणखी तीव्र करणार

पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील २२ लाख ४६ हजार अकृषक वीजग्राहकांकडे (electricity bill) वीजबिलांची थकबाकी तब्बल २५०३ कोटी १७ लाखांवर गेली आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा इतर अकृषक वर्गवारीतील थकबाकीदार आहेत. वारंवार आवाहन करून देखील भरणा होत नसल्याने वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची (Mahavitaran) आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळेच वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून लाखांच्या वर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

वीजपुरवठा खंडित केल्यावरही वीज वापरल्यास फौजदारी कारवाईच्या धडक मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. तसेच या वीजजोडण्यांची सायंकाळनंतर देखील विशेष तपासणी करण्यात येत आहे. या दोहोंमध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

पुणे विभागातील थकबाकीदार पुढीलप्रमाणे - (कंसात थकबाकी रक्कम)

पुणे जिल्हा - १० लाख ३६ हजार ६०० (१०४५ कोटी), सातारा जिल्हा-२ लाख २२ हजार ६०० (२६२ कोटी), सोलापूर जिल्हा-३ लाख ३६ हजार ९०० (६६५ कोटी), सांगली जिल्हा-२ लाख ७६ हजार ९५० (२२६ कोटी) आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार ७६० ग्राहकांकडे ३०५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

Web Title: mahavitaran power outages of more than lakhs of consumers electricity bill arrears of Rs 2,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.