माधव गाडगीळ यांना महावितरणचा ‘शॉक’

By admin | Published: March 14, 2016 01:13 AM2016-03-14T01:13:38+5:302016-03-14T01:13:38+5:30

तुम्ही बिल भरले आहे, म्हणून निवांत राहू नका, कारण महावितरण कधीही तुमचा वीजपुरवठा खंडित करू शकते़ असाच काहीसा अनुभव ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ़ माधव गाडगीळ यांना आला आहे़

Mahavitaran's 'Shock' to Madhav Gadgil | माधव गाडगीळ यांना महावितरणचा ‘शॉक’

माधव गाडगीळ यांना महावितरणचा ‘शॉक’

Next

पुणे : तुम्ही बिल भरले आहे, म्हणून निवांत राहू नका, कारण महावितरण कधीही तुमचा वीजपुरवठा खंडित करू शकते़ असाच काहीसा अनुभव ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ़ माधव गाडगीळ यांना आला आहे़
याबाबतची माहिती अशी, माधव गाडगीळ यांचे पाषाण रोडला घर आहे़ या घराचे वीज बिलाबाबत त्यांनी आगाऊ रक्कम जमा केली आहे़ त्यांना फेब्रुवारीचे वीज बिल १७२८ रुपये आले़ त्यांनी आगाऊ रक्कम भरली असल्याने त्याच बिलात ४ हजार ४३० रुपये महावितरणकडे जमा असल्याचे दाखविले आहे़ तसेच गाडगीळ यांच्या पत्नी सुलोचना गाडगीळ यांच्या नावाने त्याच सोसायटीत एक घर आहे़ या ठिकाणी सध्या त्यांची मुलगी राहते़ या घराचे वीज बिल ८ मार्चला आॅनलाईन भरले आहे़ असे असतानाही याबाबत कोणतीही नोटीस न देता शनिवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज खंडित केली़ सर्वसामान्यांना त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले़ नेमका काय प्रकार घडला आहे, त्याची चौकशी करून सांगण्यात येईल, असे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने सांगितले़

Web Title: Mahavitaran's 'Shock' to Madhav Gadgil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.