विसर्जन मिरवणुकीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज; तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 11:33 AM2023-09-26T11:33:47+5:302023-09-26T11:33:56+5:30

लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी मोदी गणपती परिसरात तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार

Mahavitraan ready for smooth power supply in Visarjan procession; Still, caution is urged | विसर्जन मिरवणुकीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज; तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन

विसर्जन मिरवणुकीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज; तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन

googlenewsNext

पुणे : गणेशोत्सवात मंडळांनी उभारलेले देखावे, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली असून, संभाव्य धाेका विचारात घेऊन सुरळीत वीजपुरवठावीज सुरक्षेसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी सुमारे ४ हजार ५७५ अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच दुरुस्ती कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांचे कर्मचारी आवश्यक साहित्य व साधनसामग्रीसह वीज ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत वीज सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार वीजपुरवठ्याचा सातत्याने आढावा घेत आहे. वीज सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची ठिकाणे आणि मोठ्या मिरवणुका निघणारे मार्ग येथे वीज यंत्रणेची पाहणी करून देखभाल व दुरुस्तीचे कामे केली आहेत. गर्दीच्या ठिकाणी किंवा मिरवणुकीच्या मार्गावर नागरिक किंवा लहान मुले फिडर पिलरवर चढू नयेत, यासाठी फिडर पिलरवर खिळे लावले आहेत. तातडीच्या मदतीची गरज भासल्यास ७८७५७६७१२३ हा संपर्क क्रमांक २९ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. यासोबतच कोणत्याही तक्रारींसाठी १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध राहणार आहे.

लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी मोदी गणपती परिसरात तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी अभियंते व कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात येत आहे. मिरवणूक संपेपर्यंत हा कक्ष कार्यान्वित राहील.

कार्यकर्त्यांनी वीज सुरक्षेबाबत सतर्क राहावे

सुरळीत वीज पुरवठ्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी असलेली महावितरणची वीज यंत्रणा निर्धोक ठेवण्यासाठी यापूर्वीच देखभाल व दुरुस्तीच्या उपाययोजना केल्या आहेत. महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांनी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज सुरक्षेबाबत सतर्क राहावे. - राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल.

Web Title: Mahavitraan ready for smooth power supply in Visarjan procession; Still, caution is urged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.