आळेफाटा भागात रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 08:03 PM2018-10-25T20:03:43+5:302018-10-25T20:07:34+5:30

नेहमीच्या आकडे टाकुन वीजचोरी पद्धती बरोबरच अलिकडच्या काळात वीजचोर विविध क्लृप्त्या वापरुन चोरी करत असल्याचे काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले आहे.

mahavitran has taken action against customers who are power theft in Alephata area | आळेफाटा भागात रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई

आळेफाटा भागात रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई

Next
ठळक मुद्देअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वीज चोरांचा छडा लावण्यास महावितरणच्या वतीने प्रारंभ वीजचोरी करणे हा गंभीर स्वरुपाचा दंडनीय गुन्हा

ओतुर- येथे नवीन युक्त्या वापरुन वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तितक्याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वीज चोरांचा छडा लावण्यास महावितरणच्या वतीने प्रारंभ झाला असुन आळेफाटा उपविभागीय कार्यालय अंतर्गत २० ग्राहकांवर कारवाईचा बडगा महावितरणने उचलला असुन यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.
नेहमीच्या आकडे टाकुन वीजचोरी पद्धती बरोबरच अलिकडच्या काळात वीजचोर विविध क्लृप्त्या वापरुन चोरी करत असल्याचे काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या आळेफाटा उपविभाग अंतर्गत गेल्या आठवड्यापासुन कारवाईस प्रारंभ झाला आहे. यासाठी कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. या मध्ये उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे, सहा.अभियंता विशाल नाईकनवरे, श्रीशैल्य लोहारे आदींचा समावेश आहे. या पथकाने पहिल्या टप्प्यात ओतुर शहर शाखा अंतर्गत मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी करणाऱ्या २० ग्राहकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे देखील ही कारवाई नियमित सुुुुरु राहणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे यांनी सांगीतले. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तर अशा प्रकारे वीज चोरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती सुजाण नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयास कळवावी असे आवाहन गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल नाईकनवरे यांनी केले आहे. ओतूर व आळेफाटा विभागात वीजचोरी करण्यासाठी रिमोट व विविध युक्त्या वापरून वीजचोरी करणारे यांच्या विरोधात महावितरणने कारवाई सुरू केली आहे .
..........................
वीजचोरी करणे हे अपघातास निमंत्रण देण्यासारखे आहे तसेच हा गंभीर स्वरुपाचा दंडनीय गुन्हा आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी न करता प्रामाणिकपणे व गरजेपुरता वीज वापर करावा. तसेच वीज चोरी करणाऱ्यां विरोधात कारवाई यापुढे नियमित सुरु राहील. श्रीकांत लोथे, उपकार्यकारी अभियंता,आळेफाटा उपविभाग 

Web Title: mahavitran has taken action against customers who are power theft in Alephata area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.