जिल्ह्यात महायुतीचा झेंडा
By admin | Published: May 17, 2014 05:34 AM2014-05-17T05:34:15+5:302014-05-17T05:35:48+5:30
नरेंद्र मोदी लाटेत जिल्ह्यातील तीनही जागा मोठ्या फरकाने जिंकून घेत महायुतीने पुणे जिल्ह्यात आपला झेंडा फडकविला़
पुणे : नरेंद्र मोदी लाटेत जिल्ह्यातील तीनही जागा मोठ्या फरकाने जिंकून घेत महायुतीने पुणे जिल्ह्यात आपला झेंडा फडकविला़ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा, अशी ओळख असलेला बारामतीचा गड राखण्यात सुप्रिया सुळे यांना यश आले असले, तरी त्यांची आघाडी साडेतीन लाखांवरून ६९ हजारांपर्यंत कमी झाली़ पुणे लोकसभा मतदारसंघातून अनिल शिरोळे यांनी ३ लाख १५ हजार मतांनी विजय मिळवत गेल्या वेळच्या पराभवाची परतफेड केली़ कोथरूड मतदारसंघात शिरोळे यांना सर्वाधिक ९१ हजार ८९८ मतांची आघाडी मिळाली, तर काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ मानल्या गेलेल्या वडगावशेरी, कॅन्टोन्मेंटसह सर्व सहाही मतदारसंघांत कोणत्याही एका पक्षाने आघाडी घेण्याची ही पुण्यात पहिलीच वेळ आहे़ शिरूर मतदारसंघात ३ लाखांहून अधिक मतांची आघाडी घेत शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी हॅट्ट्रिक साधली़ लोकसभेपैकी ५ मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असतानाही सर्वच्या सर्व सहाही मतदारसंघांत आघाडी मिळविली आहे़ भोसरी मतदारसंघात आढळराव- पाटील यांना सर्वाधिक ८४ हजार ६०२ मतांची आघाडी मिळाली आहे़