नारायणगावकरांना महावितरणचा ‘शॉक’

By admin | Published: June 15, 2016 04:56 AM2016-06-15T04:56:15+5:302016-06-15T04:56:15+5:30

नारायणगाव येथील विद्युत वीज वितरण कंपनीने नेमणूक केलेल्या एजन्सीने चुकीचे व अंदाजे रीडिंग घेतल्याने अनेक ग्राहकांना वीजबिलांचा झटका बसला आहे. वाढीव बिले आल्याने

Mahayvitaran's 'Shock' to Narayangaonkar | नारायणगावकरांना महावितरणचा ‘शॉक’

नारायणगावकरांना महावितरणचा ‘शॉक’

Next

नारायणगाव : नारायणगाव येथील विद्युत वीज वितरण कंपनीने नेमणूक केलेल्या एजन्सीने चुकीचे व अंदाजे रीडिंग घेतल्याने अनेक ग्राहकांना वीजबिलांचा झटका बसला आहे. वाढीव बिले आल्याने या गैर कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
वीज वितरण कंपनीने वीजमीटर बिलाचे रीडिंग घेण्यासाठी नव्याने एजन्सीची नियुक्ती केलेली आहे़ या एजन्सीकडून नियुक्त केलेले कर्मचारी मीटर रीडिंग व्यवस्थित घेत नसल्याने अनेक ग्राहकांना चुकीची व सदोष बिले आलेली आहेत़ बिलदुरुस्तीसाठी नारायणगावपासून २ कि़ मी़ अंतरावर असलेल्या कार्यालयात जावे लागते़ तेथे गर्दी असल्याने तास-दोनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या एजन्सीने अनेक मीटरचे रीडिंगच घेतलेले नाही़ त्यामुळे अंदाजे व सरासरीनुसार मीटर रीडिंग घेण्यात आलेले आहे. कमी रीडिंग, तर कधी जास्त अशा स्वरूपात बिले आलेली आहेत़
नारायणगाव येथील एक ग्राहक अशोक भराडिया यांचे जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यानच्या बिलांवर मीटर रीडिंगचा फोटोच घेण्यात आलेला आहे़ एप्रिल २०१६ मध्ये वापरलेल्या एक महिन्याच्या घरगुती लाइटबिलाचे बिल ९,७९० रुपये आलेले आहे़ एक महिन्यात ८०३ युनिट वापर केल्याचे लाइटबिलात दाखविण्यात आले आहे़ यापूर्वीच्या बिलांमध्ये साधारणपणे ९० ते १५० दरम्यान युनिटचा वापर दाखविण्यात आला आहे़ मात्र, एप्रिलच्या बिलामध्ये ८०३ युनिटचा वापर दाखविल्याने त्यांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे़

ग्राहकांना चुकीचे रीडिंग आले असल्यास आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत रीडिंग व्यवस्थित घेतले आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येईल़ मीटर रीडिंग घेण्याचे काम एजन्सीला देण्यात आलेले आहे़ एजन्सीने चुकीचे रीडिंग घेतले असल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल़ तसेच, ज्या ग्राहकांना चुकीची बिले आलेली आहेत, त्यांनी नारायणगाव कार्यालयाशी संपर्क साधावा.
- विवेक सूर्यवंशी, उपकार्यकारी अभियंता, नारायणगाव

Web Title: Mahayvitaran's 'Shock' to Narayangaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.