२५ कोटींची माहिती देणाऱ्या तरुणाला ८ जणांची अपहरण करून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 11:58 AM2019-05-02T11:58:42+5:302019-05-02T12:36:34+5:30

जळगावहून पुण्यात २५ कोटी रुपये घेऊन आलेल्यांची माहिती देणाऱ्या तरुणाचे ८ जणांनी अपहरण करुन लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

mahendra patil kidnapped in pune | २५ कोटींची माहिती देणाऱ्या तरुणाला ८ जणांची अपहरण करून मारहाण

२५ कोटींची माहिती देणाऱ्या तरुणाला ८ जणांची अपहरण करून मारहाण

Next
ठळक मुद्देजळगावहून पुण्यात २५ कोटी रुपये घेऊन आलेल्यांची माहिती देणाऱ्या तरुणाचे ८ जणांनी अपहरण करुन लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहिलखान, बबलू, आर. के., तेजस चव्हाण, मुन्ना व इतर ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे - जळगावहून पुण्यात २५ कोटी रुपये घेऊन आलेल्यांची माहिती देणाऱ्या तरुणाचे ८ जणांनी अपहरण करुन लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी महेंद्र काशिनाथ पाटील (वय २५, रा. गजानन मंदिर, मुक्ताईनगर, जळगाव) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहिलखान, बबलू, आर. के., तेजस चव्हाण, मुन्ना व इतर ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मावळ, हडपसरमध्ये वाटण्यासाठी पैसे आणले असल्याचे फिर्यादीला आरोपींनी सांगितले असा त्यांचा दावा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र पाटील हे जळगावमधील आरपीआय गवई गटाचे उपजिल्हाध्यक्ष आहेत. ते ऑनलाईन मार्केटिंगचे काम करतात. महेंद्र पाटील यांना त्यांचा गावाकडील मित्र डॉ. संदीप ठोसर यांनी जळगावहून पुण्याला २५ कोटी रुपये जाणार असल्याची माहिती दिली. त्यावरुन त्यांनी जळगावचे पोलीस उपअधीक्षक राजेश भागवत यांना कळविले होते. तेव्हा त्यांनी खात्री करुन घेण्यास सांगितले. त्यानंतर महेंद्र पाटील हे खराडी रक्षकनगर येथील मोर मॉलसमोरील कॉनेट लॉजमध्ये गेले. तेथे एका बॅगमध्ये २५ कोटी रुपये रोख असल्याचे फोटो व व्हिडिओ काढून पोलिसांना माहिती देतो, असे त्यांनी आरोपींना सांगितले. त्यानंतर त्यांनी पाटील यांचे अपहरण केले. राहिल खान व त्याच्या साथीदारांनी त्यांना खराडी, सासवड, कात्रज येथील विविध लॉजवर नेऊन मारहाण केली. त्यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. हे पैसे देण्यासाठी त्यांना लॉजमध्ये हातपाय बांधून कोंडून ठेवले. त्यांच्याकडील दोन मोबाईल, सोन्याची चैन, ब्रेसलेट, घड्याळ व एक कार असा ३ लाख ६७ हजार५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर त्यांची सुटका झाल्यावर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस आयुक्त डॉ़ शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू आहे. त्यानंतर २५ कोटी रुपयांचा सोक्षमोक्ष लागेल. मात्र, फिर्यादी जी बॅग दाखवत आहे. त्या इतक्या छोट्या बॅगेत २५ कोटी रुपये कसे बसू शकतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपी सापडल्यानंतरच नेमके खरे कारण काय याचा उलगडा होऊ शकेल.

 

Web Title: mahendra patil kidnapped in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.