'लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’मध्ये महेश काळे व राकेश चौरसिया यांचे होणार सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 11:26 AM2019-10-20T11:26:58+5:302019-10-20T11:27:12+5:30

बासरीच्या मंजूळ स्वरांनी रसिकमनावर मोहिनी घालणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची ‘स्वरमैफल’ म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरते.

Mahesh Kale and Rakesh Chaurasia at 'Lokmat Diwali Pahat' | 'लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’मध्ये महेश काळे व राकेश चौरसिया यांचे होणार सादरीकरण

'लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’मध्ये महेश काळे व राकेश चौरसिया यांचे होणार सादरीकरण

googlenewsNext

पुणे : अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक महेश काळे आणि बासरीच्या मंजूळ स्वरांनी रसिकमनावर मोहिनी घालणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची ‘स्वरमैफल’ म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरते.

या जादूई आविष्कारांची ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने सोमवारी (२८) पहाटे साडेपाचला महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित या कलाविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट ‘स्वरचैतन्य’मयी होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून लोकमत ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा महेश काळे यांच्या स्वरांनी रसिकांचा पाडवा गोड होणार आहे. या कार्यक्रमात महेश काळे यांच्यासमवेत राकेश चौरसिया यांच्या बासरीची जादूही अनुभवास मिळणार आहे. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर व पखवाजवर ओंकार दळवी साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाला रांका ज्वेलर्स अणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. याशिवाय काका हलवाई स्वीट सेंटर, खत्रीबंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ऊर्जा, लक्ष्मीनारायण चिवडा हे सहयोगी प्रायोजक आहेत. धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंग हे आऊटडोअर पार्टनर आहेत.

कार्यक्रम स्थळ
महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ
दिनांक : सोमवार, २८ ऑक्टोबर
वेळ : पहाटे ५.३० वाजता
कार्यक्रमाच्या विनामूल्य
प्रवेशिका उपलब्ध.

रांका ज्वेलर्स व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., यांच्या सहयोगाने उपक्रम ४‘स्वरचैतन्य’ कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सोमवारपासून (दि. २१) खालील केंद्रांवर मिळतील.

रांका ज्वेलर्स केंद्र
लक्ष्मी रोड ४कर्वे रस्ता
सिंहगड रस्ता, भारत पेट्रोल पंपाजवळ ४रविवार पेठ.
काका हलवाई स्वीट सेंटर
शॉप नं. २, चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, पौड रोड,
शॉप नं. १ अलंकार पोलीस चौकी, नवसह्याद्री, पुणे.
अभिनव कला महाविद्यालयाजवळ, टिळक रोड, सदाशिव पेठ.
खत्रीबंधू पॉट
आइस्क्रीम व मस्तानी
विठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगर
गंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगड रोड, शिवाजी पुतळा चौक, कोथरुड
शहरातील प्रमुख केंद्रे
रसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक, पुणे, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे
‘लोकमत’ कार्यालय.

Web Title: Mahesh Kale and Rakesh Chaurasia at 'Lokmat Diwali Pahat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.