विधानसभेला आमदार महेश लांडगे यांनी शिवसेनेतून उभे राहावे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 08:17 PM2019-09-09T20:17:40+5:302019-09-09T20:20:33+5:30

भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

Mahesh Landge should stand from Shiv Sena in vidhansabha election | विधानसभेला आमदार महेश लांडगे यांनी शिवसेनेतून उभे राहावे

विधानसभेला आमदार महेश लांडगे यांनी शिवसेनेतून उभे राहावे

googlenewsNext
ठळक मुद्दे: शिवाजी आढळराव पाटील : भोसरी मतदारसंघावर शिवसेनेचा दावा 

पिंपरी :भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम राहणार आहे. त्यामुळे विधानसभेला भाजप व शिवसेना युती झाली तर आमदार महेश लांडगे यांनी शिवसेनेतून लढावे, अशी माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी भोसरीत सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उपशहरप्रमुख नेताजी काशिद, उपशहरप्रमुख आबा लांडगे आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या तोंडावर कोणी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करतो आहे. सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इंदापूरमध्ये एक वजनदार नेता भाजपत प्रवेश करणार आहे, मात्र त्या ठिकाणी शिवसेनेला जागा जाणार आहे.  
भोसरीमध्ये सुद्धा शिवसेनेची ताकद आहे. आमदार महेश लांडगे यांना माझा विरोध नाही. लांडगे यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढवावी. विधानसभेला युती झाल्यास आणि भोसरी विधानसभेत शिवसेनेला जागा मिळाल्यास निवडून येणाऱ्या उमेदवाराला संधी  देण्यात येईल, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.
----- 
शिरूर लोकसभेत माझा पराभव हा भावनेचे राजकारण व जातीय समीकरणाने झाला. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभेसाठी किती वेळ काढला, भोसरीमध्ये किती वेळा आले, हडपसरमध्येही फिरकलेच नाही, त्यामुळे नागरिक आता पश्चाताप करत आहेत. भोसरी आणि हडपसरला ते कितीवेळा आले.  याचाच फायदा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला होईल, असा दावा खासदार आढळराव पाटील यांनी केला.

Web Title: Mahesh Landge should stand from Shiv Sena in vidhansabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.