५३ ग्रामपंचायतींवर येणार महिलाराज
By admin | Published: March 31, 2015 05:28 AM2015-03-31T05:28:01+5:302015-03-31T05:28:01+5:30
तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी येथील मावळ महसूलभवनामध्ये काढण्यात आली.
वडगाव मावळ : तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी येथील मावळ महसूलभवनामध्ये काढण्यात आली. तहसीलदार शरद पाटील यांनी ती जाहीर केली. त्यामध्ये अनसूचित जमाती पुरुष आणि स्त्री उमेदवारासाठी प्रत्येकी ५ जागांवर आरक्षण टाकण्यात आले. २३ ग्रामपंचायतींमधील सरपंचपद सर्वसाधारण पुरुष, तर २४ ग्रामपंचायतीमधील सरपंचपद सर्वसाधारण स्त्री उमेदवारासाठी आरक्षित ठेवले. उर्वरित ५३ ठिकाणी महिला राज येणार आहे. सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर या सोडतीने पाणी पडले. काही ठिकाणी मनासारखे आरक्षण आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसत होते. आरक्षणानंतर महसूलभवन परिसरात थोडी खुशी, थोडा गम असे चित्र दिसत होते.
गावनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे : अनुसूचित जमाती : माळेगाव, सावळा, वडेश्वर, कुणे नामा, शिरदे.
अनुसूचित जमाती स्त्री : खांड, कुसवली, कशाळ, इंगळूण, उदेवाडी.
बिगरअनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती : अनुसूचित जाती : सोमाटणे, जांभूळ, चांदखेड, कुरवंडे, शिलाटणे.
अनुसूचित जाती स्त्री : नाणोली तर्फे चाकण, वराळे, पाटण, चिखलसे, साळुंब्रे.
अनुसूचित जमाती : मुंढावरे, बेबडओहळ, वाकसई, औंढे खुर्द, अनुसूचित जमाती स्त्री : शिळींब, कोथुर्णे, शिवली, इंदुरी, मळवली.
या वेळी सभापती मंगल वाळुंजकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला. या वेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आतिश परदेशी, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, नायब तहसीलदार लेजिंद्र बोबडे, राजकुमार गभाले, सुषमा पैकेकरी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. महसूलभवन येथे पदाधिकारी व नागरिकांनी बहुसंख्येने गर्दी केली होती.
दरम्यान या गावातील सरपंचपद आपल्यालाच मिळेल या भावनेत
अनेक नेत्यांनी उधळपट्टी सुरु केली
होती. ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे
फ्लेक्स उभारण्यात आले होते.
तसेच निवडणुकीसाठी तरुण
कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात होता. (वार्ताहर)