‘महिंद्रा’त अठरा हजार रुपयांची पगारवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:31 PM2019-03-30T23:31:38+5:302019-03-30T23:32:03+5:30
कारखान्याची उत्पादनक्षमता वाढली तर कामगारांना कंपनी व्यवस्थापन वेतनकरारात भरघोस वाढ करण्यासाठी विचार करते.
कुरळी : कारखान्याची उत्पादनक्षमता वाढली तर कामगारांना कंपनी व्यवस्थापन वेतनकरारात भरघोस वाढ करण्यासाठी विचार करते. उद्योग टिकला तरच कारखाना टिकतो हेसुद्धा विसरून चालणार नाही. या वेतनकरारात कामगारांबरोबर कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्राने कामगारांना सर्वाधिक अठरा हजारांची पगारवाढ केली.
या पगारवाढीच्या आनंदोत्सवानिमित्त चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा व्हेईकल्स मॅनुफॅक्चरिंग कंपनीमध्ये कार्यक्रम आयोजिला होता. यावेळी माजी कामगारमंत्री सचिन अहिर, संतोष शिंदे, युवानेते संतोष शिंदे, संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील, जनरल सेक्रेटरी मनोज येळवंडे उपस्थित होते.
वार्षिक बोनसची वाढ लक्षात घेता कायमस्वरुपी कामगारांना १८ हजार प्रतिमहिना अशी भरघोस वेतनवाढ होणार आहे. ही पगारवाढ कामगारांच्या उत्पादकतेशी निगडित असून कंपनीस मागील उत्पादनावर दहा टक्के वाढ मिळणार आहे. हा करार साडेतीन वर्षांचा आहे. यावेळी कपंनीचे कार्यकारी अधिकारी विजय कालरा, उपाध्यक्ष विजय नायर, प्लांट हेड नचिकेत कोडकणी, व्यवस्थापक महेश करंदीकर, संजीव आनंद, प्रवीण पत्रावळी, असन सरण, ज्ञानेश पोतदार उपस्थित होते.