Maharashtra Election 2019: मनसेचं अखेर ठरलं ! राज ठाकरेंच्या सभेसाठी मिळालं मैदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:36 PM2019-10-07T16:36:36+5:302019-10-07T17:25:09+5:30
राज ठाकरेंच्या सभेसाठी अखेर मैदान मिळाले असून नातू बागेत त्यांची सभा 9 ऑक्टाेबरला हाेणार आहे.
पुणे : विधासभेच्या निवडणुकीसाठी मनसे मैदानात उतरली असून पुण्यातील विविध मतदारसंघामध्ये मनसेने आपले उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयाेजन 9 ऑक्टाेबरला करण्यात आले हाेते. परंतु शहरातील विविध शैक्षणिक संस्थांनी आपले मैदान सभेसाठी देण्याचे नाकारल्याने राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदान मिळविण्यासाठी मनसैनिक जागेची शाेधाशाेध करत हाेते. अखेर राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदान मिळाले असून नातू बागेतील सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात ठाकरेंची सभा हाेणार आहे.
मनसेने पुण्यातील विविध मतदारसंघामध्ये आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. काेथरुडमधून यंदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या विराेधात मनसेकडून किशाेर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. आघाडीने काेथरुडची जागा मित्र पक्षाला देण्याचे ठरवले हाेते. परंतु मनसेने उमेदवार उभा केल्याने आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यंदा काेथरुडची निवडणुक रंगतदार हाेणार आहे.
मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या सभेचे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आयाेजन करण्यात आले हाेते. 9 तारखेला राज ठाकरे सभा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले हाेते. त्यासाठी मैदानाची चाचपणी कार्यकर्त्यांकडून सुरु हाेती. परंतु अनेक शैक्षणिक संस्थांनी ठाकरे यांच्या सभेला मैदान देण्याचे नाकारले. त्यामुळे मनसेने पाेलीस आयुक्तांना पत्र लिहीत अलका चाैकात सभा घेण्याची परवानगी मागितली हाेती. अखेर राज ठाकरे यांच्या सभेसाठी मैदान मिळाले असून नातू बागेतील सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात 9 ऑक्टाेबरला संध्याकाळी 6 वाजता ठाकरे यांची सभा हाेणार आहे. याबाबतची माहिती मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली.