ग्रामीण भागात सोशल मीडियामुळे पत्रपेट्या ओस

By admin | Published: January 24, 2017 01:19 AM2017-01-24T01:19:20+5:302017-01-24T01:19:20+5:30

पिढ्यान्पिढ्या माणसांचे संबंध जोपासणारा डाक विभाग माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माघारला आहे. केंद्र शासनाची डाक टपालसेवा

Mailboxes dew due to social media in rural areas | ग्रामीण भागात सोशल मीडियामुळे पत्रपेट्या ओस

ग्रामीण भागात सोशल मीडियामुळे पत्रपेट्या ओस

Next

कान्हूरमेसाई : पिढ्यान्पिढ्या माणसांचे संबंध जोपासणारा डाक विभाग माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माघारला आहे. केंद्र शासनाची डाक टपालसेवा आजही मोबाईल, इंटरनेट, कुरिअरच्या जमान्यात ग्रामीण भागात पत्रव्यवहारासाठी महत्त्वाची मानली जाते. यामुळे अनेक वर्षांपासून कार्यरत डाकघरांची ग्रामीण शाखेची आता पुनर्रचना आणि आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.
वाटपात शाखेअंतर्गत गावातील पत्रे हातोहात पाठविण्याचा जणू पायंडाच पाडला आहे. संबंधित खेड्यावर ग्रामीण मेलवर्करचे दर्शन दुर्लभ झाले असून, त्याचा फटका अनेकदा सुशिक्षित बेकारांना बसत आहे. त्यांची नोकरीची मुलाखतपत्रे मुलाखत संपल्यानंतर किंवा लग्नपत्रिका लग्न आटोपल्यानंतर केव्हा तरी मिळतात. बाहेरगावाहून येणारी पत्रे प्रथम त्यावरील पत्त्याप्रमाणे त्या-त्या तालुक्यातील डाकघरात जातात.
तेथून छाननी होऊन शाखा डाकघरांना पाठविल्यानंतर त्यांचे त्या-त्या गावाला वाटप केले जाते. नाहक दिवस जातात व संबंधितांना पत्र विलंबाने पोहोचते. त्यामुळे डाक विभागाला जीवदान देण्याची गरज असून, अत्याधुनिक सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे.
याशिवाय सोशल मिडीयामुळे पत्रव्यवहार कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काही दिवसांनंतर पोस्ट आॅ्िफस बंद होतील अशी परिस्थिती निर्माण होवू लागली आहे.(वार्ताहर)

Web Title: Mailboxes dew due to social media in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.