ओझर येथील चोरी प्रकरणात मुख्य आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:13 AM2021-08-29T04:13:29+5:302021-08-29T04:13:29+5:30

ओझर येथील शांताबाई बळवंत कवडे (वय ७२) व त्यांचे पतीला जबर मारहाण करून शांताबाई यांच्या गळ्यातील २ लाख ४० ...

The main accused in the theft case at Ozar was arrested | ओझर येथील चोरी प्रकरणात मुख्य आरोपीला अटक

ओझर येथील चोरी प्रकरणात मुख्य आरोपीला अटक

Next

ओझर येथील शांताबाई बळवंत कवडे (वय ७२) व त्यांचे पतीला जबर मारहाण करून शांताबाई यांच्या गळ्यातील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे पावणेनऊ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना

दि.२५ रोजी रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान घडली. गुन्हा हा भरवस्तीत झाल्याने आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली की, गुन्हा घडले ठिकाणी शेजारी राहणारा समीर पवन सोनवणे हा परिसरात दिसला नाही. तसेच गुन्हा घडण्याच्या काही दिवस आधी तो अनोळखी इमसांसोबत फिरत होता. त्याचे काही मित्र हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातील असल्याचे समजले. माहितीनुसार समीर सोनवणे हा त्याच्या दोन साथीदारांसह आणे येथे येणार असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा लावून गुन्हे शाखेने समीर सोनवणे व त्याच्या इतर दोन साथीदार (विधिसंघर्षित बालकांना) यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. या घटनेतील अन्य तीन साथीदार फरार आहेत.

समीर सोनवणे याने पावलस कचरू गायकवाड ( रा. खरवंडी, ता. पाथर्डी, जि. अ. नगर) याच्या सांगण्यावरून व त्याने पाठवलेल्या ४ साथीदारांना गुन्हा करण्याच्या ठिकाणची संपूर्ण माहिती ओझर गावात फिरून दिली व त्यांच्या मदतीने हा जबरी चोरीचा प्रकार केल्याची कबुली दिली. पावलस गायकवाड हा नगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, दरोडे सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना ओतूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. नेताजी गंधारे, पो. हवा. हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, प्रसन्न घाडगे, दगडू वीरकर यांनी केली आहे.

पकडण्यात आलेले अल्पवयीन मुलांपैकी एक जण नुकताच १२ वी ची परीक्षा ८० टक्के गुणांसह पास झालेला आहे. किरकोळ कारणावरून घरात वाद झाल्याने तो घरातून निघून गेला होता. मित्रांसमवेत येऊन त्याने ओझर येथे गुन्हा केला.

ओझर येथील शांताबाई बळवंत कवडे (वय ७२) या दोन दिवस आधी गावी आल्या होत्या. त्यांचे पती निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. गावी आल्यावर शांताबाई बळवंत कवडे यांनी गळ्यात ८ ते ९ तोळ्यांचे दागिने घालून फिरत असल्याने शेजारी राहणारा समीर पवन सोनवणे याने पाळत ठेऊन सराईत गुन्हेगार पावलस कचरू गायकवाड याच्या मदतीने ही जबरी चोरी केली.

सराईत गुन्हेगार हे अल्पवयीन मुलांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत गुन्हे करीत असल्याचे मंचर, नारायणगाव येथील गुन्ह्यासह अनेक प्रकरणात स्पष्ट झाले आहे .

फोटो ओळ - ओझर येथील वृध्द दाम्पत्याला मारहाण करून २ लाख ४० हजार रुपयांची जबरी चोरी करणारा मुख्य सूत्रधार समीर पवन सोनवणे यास अटक करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक.

Web Title: The main accused in the theft case at Ozar was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.