बोडकेनगर तसेच इतर भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:47+5:302021-03-10T04:13:47+5:30

हजारो लिटर पाणी वाया गेले. तर पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला हे पाणी शिवाजी महाराजांच्या ...

The main pipeline supplying water to Bodkenagar and other parts burst | बोडकेनगर तसेच इतर भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली

बोडकेनगर तसेच इतर भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली

Next

हजारो लिटर पाणी वाया गेले. तर पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला हे पाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातून वाहत जात,एसटी स्थानकातही सर्वत्र पसरले त्यामुळे एसटी स्थानकाचा परिसर जलमय झाला होता.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या

जवळ एका इमारतीचे बांधकाम चालु आहे .बांधकाम व्यावसायीकडुन इमारत बांधकामासाठी पाया खोदाईचे काम काही दिवसांपासून सुरु आहे. ही खोदाई करताना सकाळी पावणेदहाच्या सुमारास यंत्राचा घाव बसल्याने बारा ईंची मुख्य पाईपलाईन फुटली.पाईप फुटल्याने पाणी

मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. बऱ्याच कालावधीपर्यंत हे पाणी रस्त्यावरून वाहत होते.या संदर्भात जुन्नर नगरपालिका प्रशासनाने संबंधित व्यवसायीकावर कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या फुटलेल्या पाईपलाईनमधून बोडकेनगर,शिपाई मोहल्ला,माई मोहल्ला

कासार आळी ,आगर भागात पाणीपुरवठा करण्यात येत होता.

बांधकाम व्यावसायीकाच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठ्यासाठी असलेले जवळपास पन्नास हजार लिटर पाणी वाया गेले.यासंदर्भात बांधकाम व्यावसायीक

मयुरेश डेव्हलपर्सला यांना नोटीस देण्यात आली .

जुन्नर शहराच्या बोडकेनगर तसेच इतर भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे

Web Title: The main pipeline supplying water to Bodkenagar and other parts burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.