मल्लाव खूनप्रकरणी मुख्य सूत्रधारांना अटक
By admin | Published: September 2, 2016 05:37 AM2016-09-02T05:37:42+5:302016-09-02T05:37:42+5:30
नगरसेवक महेंद्र मल्लाव खूनप्रकरणी आज संध्याकाळी मुख्य सूत्रधार कुर्लप बंधूंनाअटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी दिली.
शिरूर : नगरसेवक महेंद्र मल्लाव खूनप्रकरणी आज संध्याकाळी मुख्य सूत्रधार कुर्लप बंधूंनाअटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी दिली.
रविवारी (दि. २८) दुपारी भर बाजारपेठेत मल्ला यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला होता. याप्रकरणी सोमवारी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड (मोशी नाका) येथून चौघांना अटक केली होती. प्रवीण काळे, विशाल काळे, सनी यादव व रूपेश लुनीया यांना अटक केल्यानंतर दोन दिवसांनंतर अजय जाधव यास अटक करण्यात आली. या हत्या प्रकरणात नीलेश कुर्लप व गणेश कुर्लप हे सूत्रधार असल्याचे मल्लाव कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. उपरोक्त पाच जणांबरोबर कुर्लप बंधूंवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच जणांच्या अटकेनंतर सूत्रधारांना अटक करावी, अशी मल्लाव कुटुंबीयांची मागणी होती. आज उपविभागीय अधिकारी मोरे यांनी मल्लाव यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे जवाब घेतले होते. कुर्लप बंधूंच्या अटकेसाठी रविवारपासूनच पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, आज सायंकाळी कुर्लप बंधूंना अटक करण्यात आली.
आरोपींनी खुनाची कबुली दिल्याचे मोरे यांनी सांगितले. प्रथम अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने ९ सप्ट्ेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
- रविववारी घटना घडली. संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी संयम ढळू न देता शांततेत हे प्रकरण हाताळले. परिणामी, चारच दिवसांत सर्व आरोपी जेरबंद करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. दरम्यान, अजूनही गावात मल्लाव यांच्या खुनाची चर्चा आहे. गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना मल्लाव यांच्या खुनाची घटना घडली. या पार्श्वभूमीवर या गणेशोत्सवात पोलिसांना दक्ष राहावे लागेल.