पोलिसांची 'मोठी' कारवाई ; पुण्यासह तीन जिल्ह्यांत धुमाकुळ घालणारी लुटारु टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 03:52 PM2020-12-01T15:52:18+5:302020-12-01T15:53:18+5:30

१५० कि.मी.परिसरातील २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन घेतला शोध

Major action by rural police; Gangs was arrested who Robbery in three districts including Pune | पोलिसांची 'मोठी' कारवाई ; पुण्यासह तीन जिल्ह्यांत धुमाकुळ घालणारी लुटारु टोळी गजाआड

पोलिसांची 'मोठी' कारवाई ; पुण्यासह तीन जिल्ह्यांत धुमाकुळ घालणारी लुटारु टोळी गजाआड

Next

बारामती : पुणे जिल्हा,नवी मुंबईसह सोलापुर जिल्ह्यात धुमाकुळ घालणारी लुटारु टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा वावर असणाऱ्या १५० कि.मी.परिसरातील २०० सीसीटीव्हीकॅमेऱ्यांची तपासणी करुन या टोळीचा शोध घेतला आहे. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुका, बारामती शहर, जेजुरी, राजगड, वडगाव निंबाळकर, लोणंद या पोलिस ठाण्यात या टोळीविरुध्द १४ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच गुरसाळे, कळंबोली, नवी मुंबई येथेही जबरी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या टोळीच्या गंभीर गुन्ह्यांचे स्वरुप लक्षात घेता त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
 
या प्रकरणी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (रा. ढवळ, ता. फलटण), शाम शशिराज मुळे (व्ही.एन.ए.सिटी सोसायटी, नीरा, ता. पुरंदर), नीलेश बाळासाहेब निकाळजे (रा.सोनगाव बंगला, ता. फलटण) अक्षय विलास खोमणे (रा. को-हाळे बुद्रुक, ता. बारामती), राहुल पांडुरंग तांबे (रा. जेउर, ता. पुरंदर), प्रवीण प्रल्हाद राऊत (रा. चिखली, ता. इंदापूर), पप्पू उर्फ सुहास सोनवलकर (रा. वडले, ता. फलटण) व प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने (रा. तामशेतवाडी, ता. माळशिरस) यांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी चोरी, घरफोडी, दरोडा असे गुन्हे केल्याचे यातून निष्पन्न झाले आहे. त्यानुसार आरोपींचा शोध घेत असताना पथकाने  खोमणे,  निकाळजे व तांबे या तिघांना २८ नोव्हेंबर रोजी अटक केली. मात्र, २९ नोव्हेंबर रोजी आरोपी सोनवलकर,माने व वडले हे तिघे ( ता. फलटण, जि. सातारा )या ठिकाणी असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक  शिवाजी ननवरे  यांनी पथकासह  जावून प्रविण राऊत यास ताब्यात घेतले . सोनवलकर, माने यांचा पाठलाग करत असताना त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.त्यानंतर ते ऊसाचे शेतात पळून गेले. सध्या हे दोन्ही आरोपी फरारी असुन त्यांचा शोध सुरु आहे.
 
 ...पोलीस असल्याचा बहाणा करत केली होती १७.३२ लाखांची चोरी
 तर  ६ ऑगस्ट २०२० रोजी कापूरहोळ येथे बालाजी ज्वेलर्स या सराफी दुकानाते ५ आरोपींनी पोलीस उप निरीक्षकासह, पोलीस कर्मचाऱ्यांचा पोशाख परिधान करत बनावट आरोपीसह दुकानात प्रवेश केला. बनावट आरोपीला तपासाला आणल्याचे नाटक करत तुम्ही चोरांकडून सोने घेतल्याचा बनाव केला.तसेच  दुकानदाराला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुकानातील ३४.५ तोळे सोन्याचे दागिने, १ मोबाईल फोन असा एकूण रू. १७ लाख ३२,०००/- किमतीचा मुद्देमाल्तसेच नागरिकांना आरोपींचा संशय आल्यानंतर लोक त्यांना पकडण्यास गेले. आरोपींनी नागरिकांच्या दिशेने गोळीबार करून जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला होता.
—————————————————
...दुकानदाराला रिव्हॉल्व्हर लावुन लुटले
तसेच ८ जुलै २०२०  रोजी  निरा गावातील भैरवनाथ एजन्सी चितळे शॉपी येथील दुकानात पाण्याचे बाटली मागण्याचा बहाणा  करून चारजणांनी प्रवेश केला. दुकानदाराला  डोक्यास रिव्हॉल्व्हर लावून दम देऊन फिर्यादीची सोन्याची चैन व सोन्याची अंगठी, रोख रक्कम व मोबाईल असा रू. ९५,०००/- किंमतीचा माल जबरीने चोरी केली होती.तसेच २६ ऑक्टोबर रोजी पळशी येथील सराफी व्यावसायिक अमर रंगनाथ कुलथे यांच्या तोंडावर मिरची पावडर टाकून  ताब्यातील ११ तोळे सोने व १० किलो चांदी अशी रू. ११,६५,०००/- किंमतीचे दागिन्यांची बॅक जबरीने पळवून नेली होती.
———————————————

या पथकाने केली कारवाई 

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उप विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर,  धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, अमोल गोरे, सहायक पोलीस निरीक्षक  सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक शेलार, सहा.फौजदार दत्तात्रय गिरीमकर, शब्बीर पठाण, पो.हवा.चंद्रकांत झेंडे, उमाकांत कंजीर. अनिल काळे, रविराज कोकरे, पो.ना.राजू मोमीन, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजीत भुजबळ, अभिजीत एकशिंगे, पो.कॉ. अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, आदींच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. 

Web Title: Major action by rural police; Gangs was arrested who Robbery in three districts including Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.