चक्रीवादळात आंबा व हिरड्याचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:36+5:302021-05-18T04:11:36+5:30

रविवारी रात्रभर आणि सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. वाऱ्याला प्रचंड वेग होता, यामध्ये आदिवासी भागातील काही ...

Major damage to mango and gums in cyclone | चक्रीवादळात आंबा व हिरड्याचे मोठे नुकसान

चक्रीवादळात आंबा व हिरड्याचे मोठे नुकसान

Next

रविवारी रात्रभर आणि सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. वाऱ्याला प्रचंड वेग होता, यामध्ये आदिवासी भागातील काही घरांचे छत उडाले तर फलौंदे येथील घराची भिंत पडली. या वादळाने ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाची सर्वांना आठवण करून दिली. मात्र त्या वादळाएवढी याची तीव्रता नव्हती.

घाट माथ्यावरील गावांना जास्त धोका असल्याने निर्माण होणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार पश्चिम भागामध्ये फिरून परिस्थितीचा आढावा घेत होते. तसेच तलाठी, ग्रामसेवक यांच्या प्रत्येक गावांत थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

--

आंब्याचा पडला सडा

चक्रीवादळात सर्वांत मोठे नुकसान हिरडा व आंब्याचे झाले. हातातोंडाशी आलेला घास या वादळाने हिरावून गेला. आंब्यांच्या झाडाखाली फळांचा सडा पडला होता तर हिरड्या आलेला छोटा हिरडा या वादळात गळून गेला. अनेक शेतकऱ्यांचे आंबा व हिरडा हे एकमेव पीक आहे. मात्र या वादळाने हे पिक हिरावून घेतले.

चौकट

श्रीक्षेत्र भीमाशंकर तसेच डिंभे पासून वर पश्चिम भागात या चक्रीवादळात लाईटच्या पोलवर झाडे पडल्याने सगळ्या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. मागील दोन दिवसांपासून या भागात लाईट नाही. येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचा-यांचे काम सुरू होते.

--

17052021-ॅँङ्म-ि02 - आंब्याच्या झाडा खाली पडलेले आंबे दाखवताना शिनोली येथील आंबा उत्पादक शेतकरी भगवान बोऱ्हाडे

17052021-ॅँङ्म-ि03 - आंब्याच्या झाडा खाली पडलेला सडा

Web Title: Major damage to mango and gums in cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.