सॅनिटायझर कंपनीच्या आगीत 18 ठार, पुण्याजवळ औद्योगिक वसाहतीमधील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:27 AM2021-06-08T06:27:35+5:302021-06-08T06:28:10+5:30

Major fire guts sanitizer factory in Pune, 18 dead : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेच्या चाैकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र माेदींनीही २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

Major fire guts sanitizer factory in Pune, 18 dead | सॅनिटायझर कंपनीच्या आगीत 18 ठार, पुण्याजवळ औद्योगिक वसाहतीमधील दुर्घटना

सॅनिटायझर कंपनीच्या आगीत 18 ठार, पुण्याजवळ औद्योगिक वसाहतीमधील दुर्घटना

googlenewsNext

पिरंगुट (पुणे) : पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये १६ महिला कामगार आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेच्या चाैकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र माेदींनीही २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यावर पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. मात्र, सॅनिटायझरमुळे आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले. स्थानिक ग्रामस्थांनीही तातडीने धाव घेतली. घटनास्थळी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

प्राथमिक माहितीनुसार, ३७ पैकी काही कामगार बाहेर पडले. तर १० कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, १८ कामगार अडकले होते. नंतर या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने कुलिंग सुरू केले आहे. आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर तसेच इतर ज्वलनशील रसायनसाठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक लहान-मोठ्या कंपन्या असून, येथे हजारो कामगार काम करीत आहेत. 

केमिकलमुळे भडकली आग
- सॅनिटायझरसह अन्य केमिकलही बनविली जात असल्याने या कंपनीत ज्वलनशील पदार्थ असल्याने आग भडकली होती. 
- अग्निशमन दलाच्या बंबांना आणि जवानांना कंपनीमध्ये आत जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडावी लागली.

कंपनीत बहुतांश महिला कर्मचारी
या कंपनीत सुमारे ४५ कामगार असून बहुतांश महिला होत्या. आग लागली त्या वेळी ३७ कर्मचारी आतमध्ये होते. महिलांना बाहेर पडणे शक्य न झाल्याने होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

पॅकेजिंगवेळी शॉॅर्टसर्किट
दुर्घटनाग्रस्त एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीस ही कंपनी निकुंज शहा यांच्या मालकीची आहे.
दहा वर्षांपूर्वी ही कंपनी सुरू झाली. पाणी शुद्ध करण्यासाठीच्या गोळ्या बनविण्याचे काम येथे होते. यासाठी आरएम १ नावाचे रसायन वापरले जाते. ते ज्वालाग्राही आहे. त्याचे पॅकेजिंग करताना शॉॅर्टसर्किट होऊन दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. दीड वर्षापासून येथे सॅनिटायझर बनविले जात होते. 

मृतांची नावे : अर्चना कवडे, संगीता गोंदे, 
मंगल मोरगाळे, सुरेखा तुपे, सुमन ढेरे, सुनीता साठे, संगीता पोळेकर, माधुरी अंबोरे, मंदा कुलत, त्रिशाला जाधव, अतुल साठे, सीमा बोराडे, 
गीता दिवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुडाळे, धनश्री शेलार, सचिन घोडके.

Web Title: Major fire guts sanitizer factory in Pune, 18 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.